कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या
%20(4).jpeg)
कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित दि.18 कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री? सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपद...