पोस्ट्स

मोटरसायकल चोरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

इमेज
सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.  ५गुन्हे उघडकिस तर ५ मोटार सायकल केल्या हस्तगत  सासवड दि.३१      पुरंदर तालुक्यातील सासवड येथे  दि. 30/07/2023 रोजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते...त्याच्याकडे चौकशी  केली  असता त्याने पाच मोटरसायकल चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांनी त्या पाचही मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत...        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  रविवारी   पोलीस हवालदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन तसेच वाहतुक कारवाई करीत असतांना दुपारी 3 वाजलेच्या सुमारास एक तरुण संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना आढळून आला. त्याचेकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घे...