महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं लक्ष, कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ?
BJP MISSION: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे सोळा महिने शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भाजपची जय्यत तयारी सुरू असून लोकसभेत परत एकदा स्वबळावर सत्ता आणण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून भाजपचे ' मिशन 144' ( Bjp Mission 144 ) काम सुरु झाले. या मिशन 144 अंतर्गत देशातील 144 असे लोकसभा मतदारसंघ निवडले गेले ज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहत पराभवाचा सामना करावा लागला , किंवा असे लोकसभा मतदारसंघ जिथे स्थानिक आघाडीमुळे भाजप आजवर निवडणूक लढली नाही अशा मतदारसंघांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या या 18 लोकसभा मतदारसंघ भाजपच लक्ष ? दक्षिण मध्य मुंबई , मध्य मुंबई , पालघर , कल्याण , चंद्रपूर , हिंगोली , म्हाडा , बुलढाणा , धाराशिव औरंगाबाद , शिरूर , शिर्डी , बारामती , सातारा , हातकणंगले , कोल्हापूर , रत्नागिरी-सिंधुदुर्ग , रायगड · चार लोकसभा मतदारसंघ मिळून एक क्लस्टर तयार करण्यात आले · ...