Posts

Showing posts with the label ताज्या घडामोडी

सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

Image
  सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती मुंबई :      पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.        राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार सुनील वाळुंज यांची पुणे जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आहे. पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी सुनील वाळुंज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.      नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्यां बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते. सर...

वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
 वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामीण भागातील ९७६ विक्रमी रक्तदात्यांनी केले रक्तदान. वाल्हे (दि.२९) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने, वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हास्ते करण्यात आले.या आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ग्रामीण भागातील विक्रमी संख्येत रक्तदान करून, या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, प्रा.संतोष नवले, उद्योजक सुनिल पवार, गोरख कदम, हनुमंत पवार, संदेश पवार, दादासाहेब राऊत, अभि दुर्गाडे आदींसह अनेक मान्यवर, तरूण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यां प्रत्येक रक्तदात्यांस प्रशस्तिपत्र उपस्थित मान...

सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

Image
 सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा सासवड दि.३  पुरंदर मधील सर्व दिव्यांग, विधवा, निराधार यांना ताकद देण्याचे प्रामाणिक प्रयत्न यापुढे मी करणार आहे. पिवळी शिधापत्रिकासाठी पात्र दिव्यांगांनी माझ्या संपर्क कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करावी त्यांना घरपोच पिवळी शिधापत्रिका मिळण्याची मी व्यवस्था करतो तसेच पिवळी शिधापत्रिकासाठी कोणालाही १ रु सुद्धा देऊ नका तसेच कोणीही दिव्यागांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे तसेच लवकरच पुरंदर मधील दिव्यांगाचा महा मेळावा घेण्यात येईल अशी घोषणा शिंदे गटाचे गटनेते तसेच प्रवक्ता विजय शिवतारे यांनी यावेळी केली. एमआरडी अंतर्गत असणाऱ्या ३५ गावातील दिव्यांग बांधवांनी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केले.           सासवड ( ता पुरंदर ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दादा जाधवराव सांस्कृतिक भवनामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पुरंदर यांच्...

गावगाड्यातील बलुतेदार,अलुतेदार व भटक्या जमातीने इतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहिजे

Image
 गावगाड्यातील बलुतेदार,अलुतेदार व भटक्या जमातीने इतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहिजे कल्याणराव दळे अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ जेजुरी वार्ताहर दि ८ देशात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे,आणि त्यानुसार आरक्षण मिळाले पाहिजे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी आणि इतर भटक्या समाजाचे आरक्षण कमी झाले आहे याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आरक्षणाचा लढा लढण्यासाठी गावगाड्यातील बलुतेदार,अलुतेदार,व भटक्या जमातींनी इतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन राज्य बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.       जेजुरी येथे मौर्य क्रांती महासंघाचे पहिले अधिवेशन व चौथी राज्यस्तरीय धनगर जमाती समूह जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कल्याणराव दळे बोलत होते. ते पुढे म्हणाले आरक्षणासाठी ओबीसी,धनगर समाज ,व इतर समाजाचे मोठे मोर्चे झाले ,मिळाले का आरक्षण ? वेगवेगळे लढून फायदा होणार नाही,त्याचा फायदा राजकारण्यांना होणार आहे. गावगाड्यातील सर्व जाती जमातींनी एकत्रित येवून संघटीत झाले पाहिजे.प्रत्येक जातीतील माणूस आपला वाटला पाहिजे ....

सासवड येथे घरगुती वादातून फराळाच्या डब्याने बायकोने नवऱ्याला मारले

Image
  सासवड येथे घरगुती वादातून फराळाच्या डब्याने बायकोने नवऱ्याला मारले  नवऱ्याने घेतली पोलीसांकडे धाव : बायकोच्या विरोधात फिर्याद दाखल पुरंदर दि.७    पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक व्यक्तीने त्याला बायकोने मारहाण केल्याबाबत फिर्याद दिली आहे.या बाबत पोलिसांनी भरतीत दंड विधान कलम 324 नुसार महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.    यांना सासवड पोलिसांनी दिलेली माहिती.अशी की याबाबतची फिर्याद सासवड येथे राहणारे रघुनाथ मोहनराव जगताप यांनी दिलीय.जगताप यांना यापूर्वीच अर्धांग वायूचा झटका येऊन गेलाय.त्यामुळे त्यांना नोकरी नाही.त्यांनी राहते घर विकून छोटे घर घेऊन उरलेले पैसे ब्यंकेत ठेऊन येणाऱ्या व्याजाच्या पैशात गुजराण करायचे ठरवले होते.यावरून नवरा बायको मध्ये सतत वाद होत होते त्यांचा हा निर्णय त्यांच्या पत्नीला मान्य नव्हता.यातून दोघांची सतत भांडणे होत होती काल रविवारी त्यांच्या दोघात या अरुण पुन्हा भांडण झाले. त्यांनी तिला नेहमी प्रमाणे समजावुन सागंण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या बायकोने फराळाने भरलेला स्टिलचा डबा जगताप यांच्या डाव्याबाजुच्या कानाच्या वरत...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन

Image
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन    सासवड दिनांक. ३०     अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले याबाबत शनिवार (दिनांक 29) रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक पारपडली या बैठकीत मोटरसायकल रॅली काढण्याचं जाहीर करण्यात आले   पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३.नोव्हेंबर रोजी सासवड ते लोणावळा अशी ही मोटार सायकर रॅली कढण्यात येणार आहे .आज सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गणेश जगताप ,तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरूगे , व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण

Image
  पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण पुरंदर :  दि.२९         पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पोलीस दुरर्क्षेत्रातील पोलिसांनी पत्रकार भरत निगडे यांना  चौकशीसाठी बोलून कथित प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हे नोंद करू असा इशारा देत पत्रकार संघटनेच्या राहुल शिंदे व भरत निगडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढे होऊनही कथित प्रकरणाचा गुन्हा तब्बल दोन महिन्यांनी दाखल करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला. खंडणी वसूल करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी करूनही वरिष्ठांनी गुन्हे नोंद न केल्याने व्यथित होऊन शिंदे, निगडे व इतरजणांनी सोमवार ता.३१ पासून सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.              पत्रकार व पोलीस हे कायद्याचे रक्षक असून लोकशाहीचे स्तंभ आहेत. मात्र, पोलिसांच्या हातातील अतिरिक्त अधिकारांमुळे पत्रकारांची गळचेपी नित्याची झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत निगड...

पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती

Image
पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त   पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती मुंबई: पोलीस भरतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी १ नोव्हेंबरपासून भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली   आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज (दि.२९) स्थगिती देण्यात आली आहे .भरती बाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कारणामुळे पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. गेली ३ वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी अपात्र ठरणार होते. भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरतील तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आह...

मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी

Image
 मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी  पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..  मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती - जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणारया पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.. "मी अँकर" हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणारया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब...

भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!

Image
भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!        चार वर्षांच्या मुलावर ; थेट ट्रॅक्टरच अंगावर घातला आणि चिमुरड्याचा केला खुन पुणे इंदापूर तालुक्यात एका चार वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षांच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला आणि त्याचा खून करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय. इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजलीय. अबुजर जब्बार शेख असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. जमीन व्यवहाराच्या भांडणातून हा प्रकार घडला. वडिलांसोबत असलेल्या भांडणाचा वचपा त्याच्या निष्पाप मुलावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरसेवाडी गावच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. यात अबुजरचा मृत्यू झाला.इंदापरू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. प...

बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला

Image
बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला ; स्वतःला मृत घोषित करून जिवंत असल्याचा केला स्टंट अकोला  पातूर तालुक्यातील विव्हरा येथील गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. हा अघोरी कृत्याचा प्रकार चान्नी पोलिसांनी फेटाळून लावला आहे. या घटनेत सदर युवकाचा मृत्यूच झाला नव्हता. तो जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं पोलीस म्हणतायत. या युवकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो शारीरिक दृष्टीने सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील विव्हरा या गावात एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली. त्याची अंत्यविधीची तयारी सुरू झाली. त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. त्या युवकाची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. मग अचानक त्या तरुणाला जाग आली. तो तिरडीवरुन उठून बसला. प्रशांत मेसरे असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेत मागची सत्यता समोर आणली. संबंधितांची चौकशी केली. डॉक्टरांनी मृत घोषित न करता किंवा मृत्यू झाल्याचा कुठलाच पुरावा नसतानाही प्रशांत मेसरे मृत झाला असल्याचे क...

मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी

Image
 मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी  उपमुख्यमंञी फडणवीस खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण :  तर मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा       मुंबई-- मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19, व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या ची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे...

नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल

Image
  नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल ;   पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरच एक्स्प्रेस थांबवण्याची मागणी  नीरा:             नीरा (ता.पुरंदर) रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबई, नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांंचे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, नीरा रेल्वेस्थानकावर पूर्वीप्रमाणेच जुन्याच प्लॅटफॉर्मवरच गाड्या थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.         नीरा स्थानकातून पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. नीरा- पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २०) रात्री बारा पासून रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस (गाडी नं. ११०३०) तसेच गोंदिया, नागपूरकडे जाणारी महारा...

मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब युक्रेनला :युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती

Image
मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब   युक्रेनला युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती मॉ स्को :  रशिया आणि युक्रेन यांच्यात गेले कित्येक महिने सुरू असलेल्या युद्धाचे इतर सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत. आता रशियाची राजधानी असलेल्या मास्को शहरांमध्ये रस्त्यावरून पुरुष अदृष्य झाले आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये जबरदस्तीने लष्करात सामील करण्याच्या भीतीने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले आहे तर अनेक पुरूषांनी रशियाला लागून असलेल्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मॉस्को शहराची लोकसंख्या एक कोटी वीस लाख एवढी प्रचंड आहे पण सध्या मात्र मॉस्कोतील रस्ते निर्जन दिसत आहेत. शहरातील हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये कोणत्या प्रकारची गर्दी नाही दुकानांमध्ये सुद्धा तुरळकच गर्दी दिसत आहे, त्यामध्ये महिलांची गर्दी जास्त आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात जबरदस्तीने सहभागी करून घेण्याची शक्यता असल्याने अनेक पुरूषांनी देशही सोडला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख पुरुषांनी मास्को सोडून कजाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. शेजारी असलेल...

पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह

Image
  पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह सासवड दि.१५     पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे एक मानवी मृत देह आढळून आला आहे.याबाबत स्थानिक लोकांनी सासवड पोलिसात माहिती दिली आहे. हा मृत देह महिलेचा असावा असा अंदाज स्थानिक लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे   आज शनिवारी सकाळी वीर सासवड रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांना पिंपळे येथे पोमान नगर कमानीच्या समोर पाण्या मध्ये एक मानवी मृत देह असल्याचे लोकांना दिसले आहे.यानंतर या ठिकाणीं लोकांची गर्दी जमली आहे. स्थानिक लोकांनी या बाबतची माहिती सासवड पोलिसात दिली आहे. हा मृत देह अडचणीत असल्याने अद्याप तिथे कोणीही गेले नाही. या बाबत पोलिस घटना स्थळी जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.दोन दिवसा पूर्वी एक वेडसर महिला या भागात फिरत होती. कदाचित तिचा तो मृत देह असावा असा अंदाज स्थानिक लोकांनी व्यक्त केलाय 

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला

Image
  एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला जळगाव : दि.१३       शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना खोचक टोला लगावला आहे. गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येने खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असे देखील महाजन यांनी म्हटले आहे.     ...

डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल- एस.एम.देशमुख

Image
  डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल-  एस.एम.देशमुख अहमदनगर - दि.१२             डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळविली तर या माध्यमाला लोकमान्यता देखील मिळू शकेल असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. यावेळी नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अफताब मन्सूरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते.. एस.एम देशमुख यांनी डिजिटल मिडिया परिषदेच्या स्थापनेपासून मागची भूमिका विस्तारानं मांडली.. ते म्हणाले, डिजिटल मिडियाने माध्यमातील मोठा अवकाश व्यापला आहे.. राज्यात पाच हजारपेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल कार्यरत आहेत.. या माध्यमात वीस हजारांवर पत्रकार काम करीत असून त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत.. डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळत नाहीत, ...

कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली

Image
  कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली   नीरा दि.१२    पुरंदर तालुक्यातील कडेपठार डोंगरावर पिंगोरी आणि दौंडज या गावांच्या क्षेत्रात आज पहाटे जोरदार पाऊस झालाय.त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे जेऊर आणि पिसुर्टी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय.त्यामुळे पिसुर्टी गावाचा संपर्क तुटला असून हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी व शालेय मुलांना अडचण निर्माण झाली आहे.पिसुर्टी येथील अनेक मुले माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथील शाळेत  जातात त्यांना  या पुरा मुळे शाळेत जात आले नाही त्यातच आता शाळेत परीक्षा सुरू आहेत.   तालुक्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय.त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.आज पहाटे झालेल्या या पावसामुळे पिंगोरी, दौंडज, वाल्हे,या भागातील.शेतीला देखील फटका बसला आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी  पिसुर्टीकर ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर आज दिवसभर आजूनही तसाच आहे.

कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

Image
 कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला  नीरा  :         नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) सोमेश्वरनगर येथे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी कालव्याचे पाणी बंद पाईपलाईनने द्या, अशी मागणी करणारी मंडळी आता विरोध करण्याची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत असा घणाघात पवार यांनी केला. शेतकऱयांचा पाठिंबा असेल तरच अस्तरीकरण करणार असल्याचेही ते म्हणाले.  सोमेश्वरनगर येथे शेतकरी मेळाव्यात पवार यांनी कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार घणाघात केला. यंदा वीर धरणातून ४० टीएमसी पाणी वाहून गेले. निरा खोऱयातील चार धरणांची क्षमता ४८ टीएमसीची आहे. त्यातील ४० टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे शेततळे व इतर पर्यांयाचा विचार व्हावा, असे पवार म्हणाले. निरा डावा कालव्याची वहन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सध्या कालवा ६५० क्युसेक वेगाने वाहतो. ही क्षमता ११०० ते १२०० क्युसेकवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी कालव्याचा पाझर, गळती कमी करावी लागेल. ...

बेकायदेशीर डुक्कर पालणामुळे सासवडकर नागरिक हैराण.

Image
 सासवड येथील बेकायदेशीर डुक्कर पालना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन  कर्कश्श आवाज, दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक त्रस्त  सासवड ( ता पुरंदर ) येथील वीर बाजी पासलकर शाळेच्या शेजारील  लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर डुक्कर पालन करण्यात आले आहे. याबाबत सर्व कैकाडी समाजाच्या वतीने सासवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आले           लोकवस्तीत केलेल्या डुक्कर पालनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दिवसा व रात्री  कर्कश्श आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परीसरात दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे.            आत्तापर्यंत अनेक विनंती अर्ज सासवड नगरपालिकांना देण्यात आले आहेत परंतु आजतागायत कसलीही कारवाई करण्यात आली नाही यासाठी समस्त कैकाडी समाज यांच्यावतीने पुन्हा एकदा बेकायदेशीर डुक्कर पालन बंद व्हावे म्हणून सासवड नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे.        या लोकवस्तीत...