जेजुरी गडावरील भंडारा करतोय भाविकांचा आरोग्यावर परिणाम :तर ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका
जेजुरी गडावरील भंडारा करतोय भाविकांचा आरोग्यावर परिणाम तर ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका यात्रा जत्रा काळामध्ये भंडाऱ्यामध्ये होते मोठी भेसळ भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी पुरंदर अवघ्या महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल जाते, ते म्हणजे जेजुरी मध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे. पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की, या भांडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशा सोन्यासारखी पिवळी होऊन जाते.. आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं.... मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरी येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय..... या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात आलय. त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय.....त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी. अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थांचे माजी मुख्यविश्वस्त शिवराज झगडे यांनी केलीय. याबाबत...