Posts

Showing posts with the label दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ

दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा नोकरकपात; यामागचं नेमकं कारण काय?

Image
    गेल्या काही आठवड्यांपासून दिग्गज टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात आलं आहे. वॉल स्ट्रिटच्या अहवालानुसार , पुढील काही आठवड्यांमध्ये आणखी टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येईल , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार , पुन्हा एकदा मेटा कंपनी लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. अर्थतज्ज्ञांच्या मते , सध्या नोकरकपातीचा हंगाम सुरु झाला आहे , असं म्हणावं लागेल. नोकरकपात ही आर्थिक परिस्थिती आणि पुढील वर्षाचे बजेट आणि नियोजन यासह अनेक घटकांवर आधारित असते. लिफ्ट ट्रान्सपोर्ट कंपनीनेही 700 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. दिग्गज टेक कंपनी फिनटेकनेही 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला. या फक्त गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या नोकरकपात आहेत असून ही फक्त सुरुवात आहे , असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे. येत्या काही आठवड्यामध्ये आणखी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील. टेक कंपन्या येत्या ...