सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा,
सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा, राज्य सरकारने घेतलाय निर्णय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती पुणे: बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता आपल्या गावात बालविवाह झाल्यास व त्याची नोंद घेतल्यास गावकारभारी म्हणजेच सरपंचांन दोषी धरत त्यांचे पद जाऊ शक्ते. याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांंनी दिली आहे. आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा फटका सरळ गावकीचे पुढारपण करणाऱ्यांना बसणार आहे. राज्य सरकारने या कायद्याची कठोर अंमलबजावणीचे संकेतच दिले असूून त्याविषयी च् गंभीरतेचा इशारा दिला आहे. गावात बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. एवढयावरच न थांबता राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती...