माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..

 माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..




 माळशिरस दि.२९


  पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरामध्ये र दिनांक 27 28 आणि 29 मार्च या दिवशी किरणोत्सव सोहळा रंगला होता, सूर्याची किरणे या तीन दिवशी थेट शंभू महादेवाच्या पिंडीवर पडत असल्याचा अनुभव येथील भक्तांनी याची डोळा याची देही अनुभवला

      पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील, पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात दर वर्षी २७ मार्च २८ मार्च आणि २९ मार्च असा सलग तीन दिवस किरणोत्सव सोहळा होत असतो. गेल्या तीन वर्षांमध्ये हा योग भुलेश्वर भक्तांना पाहता आला नव्हता. कोरोणा या विषाणूजन्य आजारामुळे सलग तीन वर्ष न पाहता आलेला किरणोत्सव... या वर्षी सलग तीन दिवस उपस्थित राहून भुलेश्वर भक्तांनी पाहण्याचा आनंद घेतला... यावेळी 'हर हर महादेव' 'भुलेश्वर महाराज की जय', असा जयघोष करत भक्तगणांनी भुलेश्वराचे दर्शन घेतले. 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.