सासवड येथे घरपट्टी न भरणाऱ्या तीन मिळकत दारांवर जप्तीची कारवाई
सासवड दि.२९
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी वसूल करण्याची मोहीम सध्या जोरदार सुरू आहे .नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले होते. मात्र तरीदेखील घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यास सहकार्य न करणाऱ्या तीन मिळकत दारांवर नगरपरिषदेच्यावतीने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
सासवड नगरपरिषदेच्यावतीने घरपट्टी वसुलीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकामार्फत सासवड शहरामध्ये घरोघरी जाऊन घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे या मोहिमेला सासवड शहरातील बहुतांश लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र तरी देखील काही लोक ही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. अनेक वर्षे थकीत असलेल्या लोकांवर आता नगरपरिषदेच्यावतीने जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला जातो आहे.तर पाणी पट्टी थकवणाऱ्या मिळकतदारांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात येत आहे. काल दिनांक 28 मार्च रोजी नगर परिषदेच्यावतीने तीन मतदारांची मिळकत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर या मिळकतदारांनी तातडीने आपली घरपट्टी भरली. त्यानंतर सासवड नगर परिषदेच्या वतीने पुन्हा जप्त केलेल्या या मिळकती मिळकत दाराच्या ताब्यात देण्यात आल्या. असल्याची माहिती मुख्याधिकारी निखील मोरे यांनी आज दिनांक 29 रोजी दिली आहे.