जेजुरीत विजेच्या डीपीला चिकटून अनोळखी तरुणाचा मृत्यू

 जेजुरीत विजेच्या डीपीला चिकटून अनोळखी तरुणाचा मृत्यू



जेजुरी, दि. 10 फेब्रुवारी 2026 

 – जेजुरी येथील कडेपठार रोडवर हॉटेल मल्हार एम्पायर समोर एक धक्कादायक घटना घडली. विजेच्या लाईटच्या डीपीला चिकटून एक अनोळखी पुरुष जळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली.

पोलिस स्टाफ व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस बाजूला काढून तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या अंगात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेले जर्किन आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट आढळून आली आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत रमेश भोंगळे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 13/26 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे (ब.न. 2359) हे करीत आहेत.

दरम्यान, मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.