पैज लागली लाखाची... 2024 चा आमदार कोण? पवार-शिंदेंमध्ये 'काँटे की टक्कर'

अ हमदनगर/जामखेड : २०२४ मधील विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष वेळ आहे. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण आताच तापू लागले आहे. यातूनच विकासकामांचा श्रेयवादही चांगलाच पेटला आहे. काही कामांना स्थगिती , तर काही कामे आमच्याच काळात मंजूर झाली , असा दावा नेत्यांसह कार्यकर्तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले आहेत. अशातच दोन कार्यकर्त्यांनी तर येत्या विधानसभा निवडणुकीत आपलाच नेता निवडून येईल यासाठी तब्बल एक लाख रूपयांची पैज लावून धनादेश मध्यस्थाकडे दिले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या अनेक कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. दोन्ही आमदारांमध्ये जशी श्रेयवादावरून लढाई आहे तशीच कार्यकर्त्यांमध्येही हीच लढाई आहे. एखाद्या विकासकामाबाबत एखादी ' पोस्ट ' सोशल मीडियावर पडली की लगेच दावे-प्रतिदावे सुरू होतात. विरोधक सत्ताधारी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर मेसेज येत आहेत. हे काम आमचेच पैस आहे , असे सांगितले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर राजकीय वादविवाद सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग , पाणीपुरवठा योजना , एमआयडीसी , रस्ते आदी अनेक कामांबाबत श...