लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; एक लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत
वीज महावितरण विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पालघर च्या अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पालघरमधील लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाच लुचपत विभागाकडून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. दरम्यान , महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदारांवर असलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती मिळत आहे. पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकानं रंगे हात पकडलं आहे. एका ग्राहकाविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल झाल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये , यासाठी या दोघांनीही तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचं सांगत ही रक्कम तडजोडीनंतर दीड लाख करण्या...