चक्क विधानसभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग
चक्क विधासभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग सासवड पोलिसांची कारवाई सासवड दि.१ पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार mla असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता. सासवड पोलिसांनी त्याला कार सह ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केला आहे. तर पोलिसांनी हा लोगो त्याच्या कारवरून हटवला असून तो जप्त करण्यात आला आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात काही चार चाकी वाहने गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते . पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता. परंतु ती वाहने मिळून आलेली नव्हते. आज शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना त्यांना यातील क्रेेटा कार मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गा...