Posts

Showing posts with the label पदवी अभ्यासक्रमाबाबत यूजीसीनं घेतला `हा` मोठा निर्णय

ओपन डिस्टंस आणि ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाबाबत यूजीसीनं घेतला `हा` मोठा निर्णय

Image
  मुंबई , 04 डिसेंबर:   काही लोकांना आर्थिक तसंच अन्य कारणांमुळे उच्च शिक्षण घेण्याऐवजी नोकरीला प्राधान्य द्यावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना इच्छा असून उच्च शिक्षण घेता येत नाही. नोकरी , व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या वेळेनुसार शिक्षण घेता यावे , यासाठी आज अनेक विद्यापीठे , शैक्षणिक संस्था दूरस्थ शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यामुळे अनेक लोकांना नोकरी करत उच्च शिक्षण घेणं सहजशक्य झालं आहे. आता यासंदर्भातील नियमात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील कोणत्याही विद्यापीठाला मुक्त आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम सुरू करायचे असतील तर त्यांना त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून मान्यता घ्यावी लागेल. कोणत्याही विद्यापीठाला विनामान्यता मुक्त आणि दूरस्थ अभ्यास सुरू करता येणार नाहीत. या शिवाय एखाद्या विद्यार्थ्याने दूरस्थ किंवा ऑनलाइन शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली असेल तर ती पदवी नियमित विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदवीशी समकक्ष असेल , असंदेखील यूजीसीने स्पष्ट केलं आहे. ` टीव्ही नाइन हिंदी ` ने याबाबतचे वृत्त दिले आहे. वास्तविक अनेक केंद्रीय विद्यापीठा...