'पठाण' चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही"; भाजपच्या 'या' मंत्र्याने दिला इशारा

सध्या शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ' पठाण ' चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्या अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि यातील गाणी सध्या रिलीज केली जात आहेत. 2 दिवसांपूर्वी चित्रपटातील ' बेशरम रंग ' हे गाणं प्रदर्शित झाले आणि आणखी एक नवीन वाद निर्माण झाला. यानंतर लोकांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. काय आहे या गाण्यात ? या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख खान आणि दीपिकावर हे गाणं चित्रित झालं आहे. मात्र या गाण्यात दीपिकाने एक केशरी रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ' बेशरम रंग ', यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदू महासभेने या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्यानेही चित्रपटावर टीका केली आहे. भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांचा इशारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही...