पिंपरे येथील अपघातग्रस्त युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य
पिंपरे येथील अपघातग्रस्त युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य शिवतारे यांनी कुटुंबियांना थेट घरी जाऊन दिला धनादेश नीरा दि. ४ पिंपरे( ता.पुरंदर ) येथील अपघातग्रस्त तीन युवकांच्या कुटुंबांना. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. शिव सेनेचे नेते विजय शिवतारे यांनी गुरुवारी सायंकाळी सहाय्यता निधीचे धनादेश अपघात ग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. सुमारे दीड वर्षापूर्वी पिंपरे खुर्द येथील तरुणाचा नीरा लोणंद दरम्यान अपघात झाला होता.यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. यावेळी विजय शिवतारे यांनी या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले होते. यापूर्वी शेतकरी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी 2 लक्ष रुपये मदत करण्यात आली होती त्याच बरोबर आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. पिंपरे खुर्द गावामधील ओंकार थोपटे, अनिल थोपटे आणि पोपट थोपटे या तीन युवकांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. त्य...