Posts

Showing posts with the label बापाची क्रूरता

जालना जिल्हा हादरला! बापाची क्रूरता, पोटच्या पोरीची बदनामीच्या भीतीनं हत्या, अंत्यविधीही उरकला

Image
  एका घटनेनं जालना जिल्हा   हादरुन गेला आहे. जन्मदात्या पित्यानंच आपल्या 17 वर्षीय लेकीची बदनामीच्या भीतीनं हत्या केली आहे. मुलगी नात्यातील मुलाबरोबरच काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून बापानेच आपल्या मुलीची फाशी देऊन हत्या केली. नंतर प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना तालुक्यातील पीर-पिंपळगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी मयत मुलीचे वडील संतोष सरोदे आणि तिचे काका नामदेव सरोदे यांच्या विरोधात चंदन जीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मयत 17 वर्षीय तरुणी तीन दिवसापूर्वी घरातून निघून गेली होती. ती घरी आल्यानंतर तिची विचारपूस केली असता एका जवळच्याच नातेवाईकाच्या मुलाबरोबर ती गेली असल्याची माहिती तिच्या वडिलांना समजली. दरम्यान अपमानाच्या भीतीने वडिलांनीच आपल्या शेत वस्तीवर तिला गळफास देऊन जीव घेतला. यानंतर काल संध्याकाळी तिला जाळून टाकून तिचा अंत्यविधी देखील उरकला. दरम्यान गावातील लोकांना या गोष्टीची कुणकुण लागल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला , याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मयत मुलीच्या वड...