नांदगाव येथील भावंडांनी बनवले आईचे स्मारक
नांदगाव येथील भावंडांनी बनवले आईचे स्मारक भोर दि.१० पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी, आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलय.दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून, घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केलीय. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी समाजा समोर आदर्श ठेवलाय.परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलंय. भोर तालुक्यातील नांद गावाचे रहिवासी, शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे(मेकॅनिक) यांच्या घरकाम आणि शेती करणाऱ्या मातोश्री कै. राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापुर्वी करोना मुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधना नंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतू आई विषयी असणारे प्रेम,श्रद्धा,भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरा समोरच मंदिर उभारून त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श त्यांनी समाजा समोर निर्माण केला आहे. ...