मित्राचा पिस्तूल हाताळणं आल आंगलट पिस्टल मधून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी.
मित्राचा पिस्तूल हाताळणं आल आंगलट पिस्टल मधून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी... इंदापूर इंदापूर तालुक्यातील सराटी मध्ये जगदाळे फार्म वर परवाना असलेलं पिस्टल हलगर्जी पणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय....काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊसवर ही घटना घडलेली आहे. सुधीर रावसाहेब महाडिक-देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत. यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केलाय.1) प्रदिप नानासाहेब जगदाळे राहणार सराटी सराटी तालुका इंदापूर 2) सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंभुर्णी तालुका माढा 3) विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंभुर्णी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी 24 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाउस वर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा ...