मध्य प्रदेशात बस आणि कारचा भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू

 

मध्य प्रदेशात बस आणि कारचा भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू



बैतुल : 


मध्य प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बेतुलमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला.

या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बैतुल येथे आज पहाटे भीषण अपघात झाला. बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस स्टेशन परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैतूलचे एसपी सिमला प्रसाद यांनी या अपघाताची माहिती दिली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांचे गूढ — नीरा शहरासमोरील नवी सामाजिक शोकांतिका