पोस्ट्स

एक व्हिडिओ कॉल आणि सेक्सटॉर्शनला बळी पडतेय तरुणाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक व्हिडिओ कॉल आणि सेक्सटॉर्शनला बळी पडतेय तरुणाई,आयुष्याची वाट; 'हे' अख्खं गावच चालवतंय रॅकेट

इमेज
  मुंबई 25 नोव्हेंबर :   सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या पुण्यातील एका 19 वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी   आत्महत्या   केली. त्यानंतर सायबर गुन्ह्यातील ब्लॅकमेलिंगच्या या प्रकाराबद्दल बरचं काही बोललं जात आहे. राजस्थानातील एका गावातून हा सर्व खेळ चालत असल्याचा पर्दाफाश पुणे पेालिसांनी केला. इथं अख्खं गावच सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचं तपासातून समोर आलंय. सायबर गुन्हे करणारे लोक कशाप्रकारे तरुण , महिला व इतरांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर ब्लेकमेलिंग करून पैसे उकळतात हे जाणून घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. ' आज तक हिंदी ' नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत चालले आहेत. हा शब्द अनेकांना कदाचित नवीन वाटू शकतो. पण आपल्या ओळखीतील एखादी व्यक्ती याला बळी पडू शकते. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राजस्थानातील एका गावातून हा प्रकार कसा केला जातो याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे काय हे जाणून घेण्याची आता गरज आहे. यात सायबर गुन्हेगार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक सावजं शोधत असतात. त्यां...