सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
महसूल राज्यमंत्री असताना आणि मविआ सरकार जाता-जाता अब्दुल सत्तार यांनी गायरानच्या ३७ एकर जमिनीचे वाटप एका खासगी व्यक्तीला केल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असल्याच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधी पक्षाने सत्तार यांनी आताच्या कृषी मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा , अशी जोरदार मागणी करीत सोमवारी दोन्ही सभागृहे डोक्यावर घेतली. कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आज , मंगळवारीही रेटून धरणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांना मिनिटभरही पदावर राहण्याच हक्क नाही , त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी , अशी मागणी केली. विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्तार यांची अनेक प्रकरणे आहेत. त्यांच्या कार्यकाळात असेच वादग्रस्त निर्णय झाले असल्याने या प्रकरणांची चौकशी करावी , त्यांचा राजीनामा घ्यावा , अशी मागणी त्यांनी केली. काय आहे प्रकरण ? - मौजे घोडबाभूळ (जि. वाशिम) येथील सरकारी गायरान जमीन गट नं. ४४ मधील ३७ एकर १९ गुंठे जमिनीचा हा घोटाळा दीडशे कोटींचा आहे. गायरान जमिन...