पोस्ट्स

औषध खरेदी करतांना 'ती' सक्ती चालणार नाही लेबलसह पोस्ट दाखवत आहे

औषध खरेदी करतांना 'ती' सक्ती चालणार नाही, अन्न व औषध प्रशासनाने स्पष्टच सांगितलं.

इमेज
  रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा एक आदेश अन्न व औषध प्रशासनाने काढला आहे. यामध्ये रुग्णालयाच्या संलग्न असलेल्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. इतकंच काय तर रुग्णालयात निदर्शनास पडेल अशा ठिकाणी त्याबाबतचा फलक लावावा असे आदेशात म्हंटले आहे. एकूणच अन्न व औषध प्रशासनाने आदेशीत केलेल्या सुचनांमुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा रुग्णालयाच्या संलग्न असलेल्या दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करतात त्यामुळे चढया किमतीने औषधे खरेदी करण्याची नामुष्की ओढवत असते. होलसेलमध्ये ओळखीने औषधे खरेदी केल्यास मोठी तफावत जाणवत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी नुकतेच आदेश काढून औषध खरेदी करण्यासाठी रुग्णालय सक्ती करू शकत नाही असा निर्वाळा केला आहे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या दुकानातून अनेकदा जास्त दराने औषध खरेदी करण्याची वेळी येते , रुग्णालय देखील त्याबाबत तगादा लावत असते. दरम्य...