पोस्ट्स

रामदास आठवलेंच्या पक्षात घृणास्पद घटना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रामदास आठवलेंच्या पक्षात घृणास्पद घटना, नेत्याने बलात्कार करून केला गर्भपात, पोटावरच मारली लाथ

इमेज
   (औरंगाबाद) , 29 नोव्हेंबर :   औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या महिलेला गरोदर करून तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गर्भपात केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार , रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल , तुझ्या सोबत लग्न करेल , तुला घर देईल असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातून महिला गरोदर राहिली त्यानंतर महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता वारंवार क...