रणशिंग फुंकले; खोके सरकारला घेरणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत अॅक्शन प्लान ठरला
वि दर्भात अवकाळी पाऊस , कापूस , सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना भेडसावणारे महागाई , बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ईडी सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर येथे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधान भवनातील कार्यालयात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे , ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , बाळासाहेब थोरात , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , दिलीप वळसे-पाटील , एकनाथराव खडसे , हसन मुश्रीफ , अनिल परब , सुनील प्रभू , अजय चौधरी , शशिकांत शिंदे , भाई जगताप , सचिन अहिर , सुरेश वरपूडकर , अमिन पटेल , अनिल पाटील , बाळाराम पाटील , अबू आझमी , कपिल पाटील , रईस शेख असे विधिमंडळाच्य...