Posts

Showing posts with the label पत्रकार परिषद

*वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा*

Image
 *वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा*  *मोहाडी, धामणगाव, औढा नागनाथ, अमळनेर, जत, पैठण, महाड, पुरंदर तालुका पत्रकार संघ ठरले मानकरी*  मुंबई दिनांक ५ : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराची आज येथे घोषणा करण्यात आली आहे.. लवकरच लातूर जिल्हातील चाकूर येथे होणार्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.. राज्याच्या विविध भागातील पत्रकार संघ वर्षभर अनेक उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपत समाज जागृतीचे कार्य करीत असतात..समाजाकडून अशा पत्रकारांच्या किंवा पत्रकार संघाच्या कार्याची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही.. त्यामुळे देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने उत्कृष्ट कार्य करणार्या  तालुका संघांच्या कार्याचं कौतूक करण्याची परंपरा गेली सहा वर्षे सुरू केली आहे..जाणीवपूर्वक राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरस्कार वितरण सोहळे आयोजित करून पत्रकार संघांचा यथोचित गौरव केला जातो.. .. २०२२ चे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण लातूर जिल्ह्यातील ...

एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

Image
  एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा   पिंपरी - चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज पिंपरी चिंचवडला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला..पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशनाची तयारी सुरू असल्याबद्दल देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.. यावेळी बोलताना अरूण नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी मराठी पत्रकार परिषदेने विश्वास दाखवत अधिवेशनाची जबाबदारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघावर सोपविल्याबददल एस.एम देशमुख यांचे आभार मानले.. परिषदेचं हे अधिवेशन परिषदेच्या नियमानुसार आणि धयेयधोरणानुसार तसेच परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेशा पध्दतीने साजरे केले जाईल असा विश्वास नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केला.. अधिवेशन सर्वसमावेशक व्हावे यासाठी संघाच्या सर्व सदस्यांची मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी दर शनिवारी सर्व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असून त्या संबंधीचे अहवाल न...

शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष :२ सप्टेंबरला पुण्यात सत्कार*

Image
 *शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष :२ सप्टेंबरला पुण्यात सत्कार*  . मुंबई : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे हे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.  १ सप्टेंबर २०२२ रोजी ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेत आहेत. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याने शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.      मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच पुढील अध्यक्ष असतो. त्यानुसार कार्याध्यक्ष राहिलेले शरद पाबळे आता अध्यक्ष होत आहेत. मावळते अध्यक्ष गजानन नाईक यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील. त्यांची अध्यक्षपदाची मुदत दोन वर्षांची असेल. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ८३ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे शरद पाबळे हे ४४ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. शरद पाबळे हे सकाळचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. गेली २५ वर्षे पत्रकारिते...