Posts

Showing posts with the label कर्नाटकाने 'सीमा' ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली.

तणाव वाढला! कर्नाटकाने 'सीमा' ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली

Image
  मुं बई/बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली , तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. टाेलनाक्यावर बंदोबस्त कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक व महाराष्ट्राचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. टोलनाक्याजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विजय देवणे यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्...