Posts

Showing posts with the label जिल्हा उद्योग केंद्र

सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
 सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन    पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली असून, जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.      उद्या दिनांक 29 जुलै रोजी हा मेळावा सासवडनगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी या मेळाव्यात येऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. मेळाव्याला येताना इच्छुक तरुणांनी शाळा सोडल्याचा दाखला,मार्कशिट ,आधार कार्ड, पॅनकार्ड , बँकेचे पासबुक जागेचे कागदपत्र, असल्यास प्रकल्पाचा अहवाल घेऊन यावे असे सांगण्यात आले आहे. उद्या दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे