Friday, June 30, 2023

पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर

 पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर




नीरा दि 30


  पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत आज 30 जून रोजी संपन्न झाली पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हो सोडत पारपडली. 

 पुरंदर तालुक्यातील आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे चिव्हेवाडी अनुसूचित जमाती, देवडी (अनुसूचित जमाती महिला,), सुपे खुर्द (अनुसूचित जमाती,) देवकरवाडी (अनुसूचित जमाती), काळदरी (अनुसूचित जमाती), राख (विशेष मागास प्रवर्ग), वीर (विशेष मागास प्रवर्ग महिला), तक्रारवाडी (भटक्या जमाती), लपतळवाडी (भटक्या जमाती महिला), तोंडल (भटक्या जमाती महिला), सुकलवाडी (भटक्या जमाती) पिंपळे (भटक्या जाती) आडाचीवाडी (भटक्या जाती) नवलेवाडी (इतर मागास वर्ग) बेलसर (इतर मागासवर्ग महिला), जवळ अजून (इतर मागासवर्गीय), कोळविहिरे( इतर मागासवर्गीय महिला) थोपटेवाडी (इतर मागासवर्गीय)

तर वागदरवाडी, सटलवाडी, सोमुर्डी, हरगुडे, आंबोडी,हरणी, नारायणपूर, हिवरे, राजेवाडी, मांडकी, पोंडे या गावातील पोलीस पाटीलपद राखीव असणार आहे.. अशाप्रकारे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली याबाबतची माहिती प्रांत कार्यालयाकडून देण्यात आली आहे.



Monday, June 26, 2023

लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी



लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी 


लोणंद, २७


लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावकलवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली असून याप्रकरणी लोणंद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावकलवाडी ता खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील महादेव पांडुरंग शेंडगे यांच्या घराचे कुलूप दि. २६ रोजी भरदिवसा अनोळखी तीन चोरट्यांनी तोडून घरातील बेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे एक लाख पंचेचाळीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद महादेव शेंडगे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालसिम व लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड

 

निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड

 


 खळद ता. २६ : निळुंज (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस पक्षाच्या अश्विनी उमेश बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . सोमवारी झालेल्या निवड नुकीत अश्विनी उमेश बनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंभारवळण विभागाचे मंडल अधिकारी दुर्गादास शिळकंदे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप व तलाठीन नीलम  कांबळे यांनी त्यांना या कामी सहकार्य केले.

               निळुंजच्या माजी सरपंच रूपाली जगताप यांनी आपला निर्धारित कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश होले ,माजी सरपंच रूपाली जगताप, उपसरपंच उमेश बनकर , ग्रामपंचायत सदस्य रूपाली बनकर, उज्वला बनकर, समिर बनकर उपस्थित होते.

        निवडीनंतर  माजी सरपंच विलास बनकर, अशोक बनकर, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ बोरावके,शरद जगताप,अनिल बनकर, किसन जगताप, ज्ञानोबा बनकर,अतुल जगताप, रामचंद्र लडकत, कैलास बनकर, पोलीस पाटील सीमा बनकर, नारायण जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यस्थापन अध्यक्ष  उमेश बनकर ,समाज सेवक राजेंद्र जगताप, मयूर  जगताप, अतुल जगताप, तुषार बनकर, अशोक बनकर शरद बनकर, वैभव  बनकर, लक्ष्मण बनकर,  वैभव जगताप, नितीन बनकर, गणेश बनकर, आकाश बनकर, सागर बनकर,सनी जाधव,सचिन बनकर, उपस्थित होते.

Saturday, June 24, 2023

पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

 पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती

  शुक्रवारी होणार आरक्षण सोडत 



नीरा दि 23


  पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी 30 जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.या बाबतचे आदेश पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.याबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. सबंधित गावातील इच्छुक लोकांनी यावेळी उपस्थित राहण्या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुरंदर मधील तीस गावांना लवकरच पोलीस पाटील मिळणार आहेत.गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचे काम पोलीस पाटील करत असतात.


नारायणपूर,काळदरी, सोमुर्डी,हिवरे,तोंडल,सुपे खुर्द

हरणी,सोनोरी,आंबोडी,हरगुडे,तक्रारवाडी, कोळविहरे

वाल्हे,बेलसर,देवडी,चिव्हेवाडी,थोपटेवाडी,मांडकी, पोंढे,वीर

सटलवाडी,नवलेवाडी,लपतळवाडी,वागदरवाडी,आडाचीवाडी,सुकलवाडी जवळार्जुन,राजेवाडी,राख,पिंपळे या गावातील पोलीस पाटील भरती साठी ही सोडत होणार 

आहे.

१६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!

 १६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!



नवी दिल्ली प्रतिनिधी .२४



मेघालय उच्च न्यायालयाने एका पॉक्सो प्रकरणात महत्त्वाचं मत मांडलं आहे. सेक्सच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असं मत मेघालय हायकोर्टाने मांडलं आहे. यासोबतच कोर्टाने पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेली FIR रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत.

लाईव्ह लॉने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर १६ वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा तरुणाने केला होता.


दोघांचे प्रेम असल्याचा दावा


या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसंच, या मुलीनेही कोर्टात दिलेल्या आपल्या जवाबात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी कोणतीही जबरदस्ती केली गेली नव्हती. त्यामुळे, याकडे बलात्कार म्हणून पाहू नये अशी मागणी या तरुणाने केली होती.


कोर्टाचा दिलासा


मेघालय उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. या घटनेतील पीडितेच्या वयातील व्यक्तींचा मानसिक आणि शारीरिक विकास पाहता, लैंगिक संबंधांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असतात असं कोर्टाने म्हटलं. न्यायमूर्ती डब्लू. डिएंगदोह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामुळे या तरुणाविरुद्धचा पॉक्सोचा गुन्हा रद्द करण्यात यावा असे आदेशही कोर्टाने दिले.

Thursday, June 22, 2023

बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले

 बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले 



पुणे दि.२३



रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा "भयंकर स्फोट " झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी.

जॉन मॅगर यांनी गुरुवारी सांगितले.

ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने आज ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले आहे.

बेपत्ता पाणबुडीत कोण होते?


बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक असलेल्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली.


त्यानंतर टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी आठ तासांचा कालावधी लागतो. पण टायटन त्यात यशस्वी ठरली नाही. ओशनगेट एक्स्पिडिशन्सने नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की."आमचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गोलेट यांना दुर्दैवाने आपण गमावले आहे यावर आपल्याला विश्‍वास ठेवावा लागणार आहे "


ओशनगेटने या निवेदनात म्हटले आहे की, या दु:खद काळात या पाच आत्म्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आम्ही पूर्ण अंतःकरणाने आहोत. ज्यांनी त्यांच्या आप्त स्वकीयांचा जीव गमावला त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू

 पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू



 सासवड दि.२२


    पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यामध्ये दोघा भावांच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केल असून जेजुरी पोलिसात या संदर्भात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद विशाल अनंत कड यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जालिंदर चौंडकर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ संतोष कड यांना जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या पोटामध्ये प्रत्येकी दोन वेळा चाकू खुपसून गंभीर जखमी केले.  याबाबतची फिर्याद त्यांनी जेजुरी पोलिसात दिली असून या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307, 323 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला


  याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26 /6 /2023 रोजी सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारास फिर्यादी आणि गावातील वायरमन बाबुराव आवळे, मधुकर राजारा कड असे तिघे गावातील शिवशंभू हॉटेल समोर उसाचा रस पीत असल्यास बसलेले असताना त्यावेळी आरोपी जालिंदर चौंडकर  आणि त्याची मुलगी मोटरसायकल वरून येथे आले मुलीला हॉटेलमध्ये ठेवून जालिंदर लगेचच बाहेर आला आणि फिर्यादी यांच्याकडे बघून म्हनाला की, मला तीन-चार वर्षांपूर्वी तू नडला होता. त्यावर फिर्यादी आरोपीला म्हणाले की, तू आता तुझ्या मुली सोबत आलेला आहेस तु घरी जा. मात्र तरी देखील आरोपीने त्यांच्या अंगावर धावून येऊन त्यांचे कॉलर पकडले त्यावेळी दोघांमध्ये  धक्काबुक्की झाली.त्यावेळी मधुकर कड आणि आवळे वायरमन यांनी भांडण सोडवले . यानंतर तो मुलीला घेऊन दमदाटी करत निघून गेला. आज तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून तो गेला. यानंतर फिर्यादी हे त्यांच्या शेतात गेले सायंकाळी सहा वाजले तर सुमारास त्यांचा चुलत भाऊ संतोष बाळासों कड  यांनी फिर्याद यांना फोन करून सांगितले की, जालिंदर हा घरी आला आहे आणि तो बाया माणसांना शिवीगाळ करत आहे. यानंतर ते ताबडतोब शेतातून घरी आले. त्यावेळी जालिंदर हा निघून गेला होता. त्यांच्यासोबत मधुकर कडे होते त्यावेळी संतोष हा गावात गेला होता. मधुकर कड यांना सोडवण्यासाठी  फिर्यादी   नायगाव येथे आले असता त्यांनी त्यांना चौकात सोडले. त्यावेळी जालिंदर चौकत  होता. हातात चाकू घेऊन तो त्यांच्याकडे पळत आला आणि तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून काही समजण्याच्या आतच त्याने त्यांच्या हातातील चाकू दोन वेळा फिर्यादींच्या पोटात दोन वेळा खुपसला. यामध्ये त्यांचे आतडे बाहेर निघाले. त्यावेळी त्याला धरण्यास संतोष कड हा आला असता त्याला देखील त्याने त्याच्या हातातील चाकू दोन वेळा पोटात खुपसून गंभीर जखमी केले. यानंतर ते दोघेही बेशुद्ध पडले यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले. याबाबतची फिर्याद जेजुरी पोलिसात देण्यात आली असून या संदर्भातील अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

Wednesday, June 21, 2023

दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरे पोलिसांच्या ताब्यात

  दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरे पोलिसांच्या ताब्यात 



पुणे 


दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.. आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.


दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला.


राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.



राहुल हांडोरे नेमका कुठं होता?


वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता.


पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता

 ते कोलकाता होतं

Tuesday, June 20, 2023

दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण...! डोक्यात आणि शरीरावर जखमी झाल्याने मृत्यू

पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 



१२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासात सीसीटिव्ही बाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे. मात्र राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंग गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकाविला होता.

 दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे येऊन आम्ही चौकशी साठी आलो तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली असल्याचे दर्शनाच्या वडिलांकडून सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा खून झाल्याचे समोर येत आहे.

Monday, June 19, 2023

नीरा परिसरात वारीच्या वाटेवर झाडे लावणार : राजेश काकडे

 नीरा परिसरात  वारीच्या वाटेवर झाडे लावणार : राजेश काकडे 

  दत्तघटावर करण्यात आले पिंपळ वृक्षाचे बीजारोपण 



 नीरा  दि. १९


    संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्या दत्तघाटावर स्नान घातला जाते त्या दत्तघाटावर आज सोमवारी निरा ग्रामपंचायत व गायत्री परिवाराच्यावतीने सुवर्ण पिंपळ वृक्षाचे म्हणजेच आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी असलेल्या पिंपळ वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले.नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,सदस्य राधा माने,वैशाली काळे यांच्या हस्ते या वृक्षाच्या बियांचे रोपंनकरण्यात आले.


  संतांचा पालखी सोहळा आता पंढरीकडे मार्गस्थ होतो आहे. मात्र या संतांच्या वाटेवर वारकऱ्यांना उष्णतेचा सामना करावा लागतो आहे. पाऊस लांबल्याने उष्णता वाढली असली तरी रस्त्यावर झाडे नसल्याने वारकऱ्यांना सावली मिळत नाही.



 या वारीच्या वाटेवर झालेल्या वृक्षतोडीमुळे वारकऱ्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे .या वारीच्या वाटेवर वृक्ष लागवडीचे आवाहन  सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी केलं होत. यानंतर आता नीरा ग्रामपंचायत आणि गायत्री परिवाराच्यावतीने वृक्षारोपण करण्यात येतं आहे. आज निरा येथील दत्त घाटावर पिंपळ वृक्षाचे बीजारोपण करून  वृक्ष लागवडीस सुरवात करण्यात आली. यावेळी गायत्री परिवाराचे विजय धरावडकर,त्यांचे सहकारी व नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,ग्रामपंचायत सदस्य अनंता शिंदे,माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, विजय शिंदे,तेजस जेधे, अण्णा माने, तुळशीराम जगताप ,  इत्यादी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



    यावेळी बोलतांना उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की,वारीच्या वाटेवर झाडे लावणे गरजेचे आहे.नीरा ग्रामपंचायतीवतीने वारीच्या वाटेवर झाडे लावण्यात येतील .त्याच बरोबर त्याच जातन करण्याची  आणि  ते मोठ होई पर्यंत सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायत घेईल.वारकऱ्यांना उन्हातून प्रवास करावं लागू नये म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या भागात वारीच्या वाटेवर झाडे लावायला  हवी आहेत.असेही ते म्हणाले. 


Sunday, June 18, 2023

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत

 मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा होणार गौरव



मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण २३ जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते दु.०३ वाजता होत आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.. अशी माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.. 


८५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.२०२२ च्या पुरस्कारांचे वितरण २३ जून रोजी मुंबईत नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जाणार आहे.. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला जाणार आहे.२५ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यापुर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा.गो.वैद्य,पंढरीनाथ सावंत आदि मान्यवर पत्रकारांना दिला गेला आहे.


जीवन गौरव पुरस्काराव्यतिरिक्त आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना, शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार न्यूज १८ लोकमतचे मिलिंद भागवत यांना, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारूती कुंदले यांना, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार धुळयाचे बापू ठाकूर यांना, नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांना, रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार अलिबागचे पत्रकार मोहन जाधव यांना दिला जात आहे.शिवाय संतोष पवार स्मृती उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार धुळ्याचे पत्रकार गोपी लांडगे यांना दिला जाणार आहे.. 


पुरस्कार वितरण सोहळयास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबईचे विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले आहे.

माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान 



माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप 


नीरा : (राहुल शिंदे ) 


नीरा भिवरा पडता दृष्टी ! 

स्नान करिता शुद्ध सृष्टी! 

अंती तो वैकुंठप्राप्ती ! 

ऐसे परमेष्ठी बोलिला !! 


      माऊली माऊली' नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज रविवारी माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन, माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.  



          पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावाला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन - भाकरी, वेगवेगळ्या चटण्या,खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

     


        नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. उन्हाची ताव्रता असल्याने यावर्षी ग्रामपंचायतीने दर्शनरांगेवर मंडप टाकून सावली केली होती. पालखीतळ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.  


    माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सिमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. 



    नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना (मंद वारा सुटला होता.) पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त अँड.विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती. माऊलींचा स्नान सोहळा देशभरात पाहता यावा यासाठी टिव्हि चँनल व माध्यम प्रतिनीधींनही मोठ्या संख्येन उपस्थीत होते. 


            माऊलींच्या स्नानापुर्वी पालखी सोहळ्याला प्रशासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक  अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंदभोईटे, पुरंदर-भोरचे पोलिस उपअधिक्षक तानजी बरडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगव न पवार, डॉ. अभय तिडके, गटविकास अधिकारी अमिता पवार, पुणे , माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, कांचन निगडे माजी उपसरपंच कुमार मोरे ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप दिला. 


१) 

   दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदितून निघण्यापूर्वी वारकरी आपल्या शेता पेरणी करुन वारीला जात असतात. पालखी सोहळा पुरंदर मधून मार्गस्त होतान पावसाचा शिडकाव असतो. मात्र यावर्षी पालखी सोहळ्या दरम्यान पाऊस न पडल्याने शतकरी वारकरी शिंतेत असुन ; यावर्षी पालखी कोरडी गेल्याचे ते बोलत होते. 


२)

     वाल्हे ते नीरा दरम्यानच्या रस्त्यावरील जुनी झाडे तोडल्याने वारकऱ्यांना सावली दुरापास्त होती. प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींना रस्त्याच्या कडेला सावली करण्याच्या सुचना दिल्या होत्या. प्रशासनाने तशी सोय करण्याचा प्रयत्न ही केला मात्र लखो वारकऱ्यांच्या फुढे ही सोय तोकडी पडली. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याला उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

३) 

      पालखी सोहळा काळात आरोग्य विभागाचे काम कसोटीचे असते. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना मोठी कसरत करावी लागते.यावर्षी जास्तीचा उन्हाचा चटका असल्याने आरोग्य विभागाने औषध पुरवठा केला त्याच बरोबर नीरा येथे विशेष प्रथोमापाचार केंद्र उभारण्यात आले होते त्याच बरोबर महिलांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आले होते.


Saturday, June 17, 2023

दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही! वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका

 दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही! वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका



मुंबई दि.१८


वाहतुकीचे नियम मोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. याच वेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवत न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा झटका दिला.


वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही. तसेच दुचाकीचालकाने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.


सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, कुलाबा परिसरातील एन.एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. वाहतूक पोलीस जवळ येत असल्याचे पाहून त्याने लगेच हेल्मेट घातले होते. या वेळी वाहतूक नियम मोडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दंडवसुलीची कारवाई सुरू केली, तेव्हा सागरने कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून सागरविरुद्ध भादंवि कलम 332 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि 25 मे 2017 रोजी त्याला अटक केली होती. मागील सहा वर्षे या घटनेचा खटला सत्र न्यायालयात चालला. आरोपी सागरने कॉन्स्टेबलकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केले होते. त्यानंतर त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला गेला. याचदरम्यान कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. तथापि नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेणे हे बेकायदेशीर कृत्य आहे, असे मत नोंदवत सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी आरोपी सागर पाठकची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली आहे, ते पाहता वाहतूक पोलिसावर शासकीय कर्तव्य बजावताना हल्ला झाल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.


न्यायालयाने काय म्हटले?


वाहतूक पोलिसाने ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेतले होते. त्यामुळे आरोपीचे नाव आणि पत्ता कळला होता. त्याआधारे वाहतूक पोलीस जुन्या वाहतूक नियमांनुसार कारवाई करू शकले असते. तथापि, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालकाकडून जबरदस्तीने दंडाची रक्कम मागण्याचा अधिकार नव्हता.


वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ई-चलान, पावती प्रक्रिया किंवा नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र घेऊन कारवाई केली जाऊ शकते, यात वाद नाही. दुचाकी चालकाला पोलीस ठाण्यात येण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. आरोपी चालकाने ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यास, त्याला दंडाची रक्कम संबंधित प्राधिकरणासमोर जमा करण्यास व त्यानंतर लायसन्स परत घेण्यास सांगू शकतो.

Tuesday, June 13, 2023

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन

 

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन 



पुणे दि.१४



  राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागणी संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 13 जून रोजी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे याबाबतची माहिती पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली


      राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात पोलीस पाटलांनी आंदोलन केलं होतं. यावेळी सरकारने या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही पोलीस पाटलांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर दिनांक 13 जून रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन वाढ आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये पोलीस पाटलांचा विषय मार्गी लावला जाईल याबाबत ठोस आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. पोलीस पाटलांच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आ.मंगेश चव्हाणयांनी पुढाकार घेतला.



     मागील 22 डिसेंबरच्या मोर्चामध्ये त्यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन केले होते आणि त्यांनी पाठपुरावा सुद्धा चालू केला होता. यावेळी राज्याचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील श्री कमलाकर मांगले पाटील, राज्य सचिव श्री निळकंठ थोरात पाटील, खजिनदार जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे पाटील, दीपक चौधरी पाटील, किशोर भदाने पाटील, तालुकाध्यक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू काका राक्षे पाटील,श्री गुलाब मि॓ढे, राज्य सरचिटणीस श्री विजय कुंजीर पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाजीराव पवार पाटील, दिनेश पाटील ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश घेणे पाटील,जिल्हा संघटक रायगड नांदेड जिल्हा अध्यक्ष भास्कर कंकाळ पाटील, प्रवीण गोसावी पाटील, खानदेश विभाग अध्यक्ष जीवन पाटील, चाळीसगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, हेमराज पाटील कार्याध्यक्ष जळगाव, रावसाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, विजय पाटील तसेच राज्यातील अनेक पोलीस पाटील आजच्या बैठकीला हजर होते. गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांचा पाठपुरावा राज्यातील पोलीस पाटील भक्कम साथ आहे. लवकरच पोलीस पाटलांच्या पदरी मानधन वाढीच्या आनंदाची बातमी मिळेल अशी माहिती वाघापूर चे पोलीस पाटील आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस विजय कुंजीर यांनी दिली आहे.



डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर

 डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर

नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुख ; मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन



मुंबई- स्वतंत्र बाण्यानं काम करणारी डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडावर असून देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय. असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.


एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, भांडवलदारी माध्यम व्यवस्थेला टक्कर देत देशात अनेक युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्स उत्तम पत्रकारिता करीत आहेत.. देशातील अनेक बडे पत्रकार, संपादक नव्या डिजिटल व्यवस्थेशी जोडले गेलेले आहेत.. सरकारचं दडपण झुगारत, स्वतंत्र बाण्यानं काम करणारी ही डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडारवर आहेत.. आयटी कायद्याचं कलम 69 A चं उल्लंघन केल्याचं कारण देत सरकारनं गेल्या दोन वर्षात तब्बल 150 युट्यूब चॅनल्स बंद केली आहेत.. या चॅनेल्सवरून देशविरोधी मजकूर प्रसारित होत होता असं सरकार म्हणतंय.. युट्यूब पत्रकारांना हा आरोप मान्य नाही.. सरकार विरोधी बातम्या दिल्याने ही चॅनल्स बंद केली गेली असल्याचं युट्यूब चॅनल्स चे संपादक सांगतात, असेही एस.एम. देशमुख यांनी नमुद केले. देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय..

Saturday, June 10, 2023

जेजुरी नजीक एसटी आणि पिकअप टेम्पोचा अपघात वारकरी जखमी

 जेजुरी नजीक एसटी आणि पिकअप टेम्पोचा अपघात 

वारकरी जखमी



     जेजुरी दि.१०

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकप टेम्पो यांचा भीषण अपघात झालाय. पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे बाजूकडून वाल्हेकडे  निघालेल्या पिकअप  टेम्पो यांची समोरा समोर जोरदार धडक झाली.. 



       यामध्ये एसटीतील 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. यातील  एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या  डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे... अपघातानंतर जेजुरी पोलीस आणि स्थानिकांनी मदत करून जखमींना बाहेर काढलय.. याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने दोन्ही वाहने समोरा समोर एकमेकांना धडकलीत...  यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून. 15 ते 16 लोक जखमी झाले आहेत.

Wednesday, June 7, 2023

नीरा पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

 नीरा पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; कार्यवाहीकडे जिल्ह्याचे लक्ष




नीरा ता.

  नीरा (ता.पुरंदर) येथील भरत निगडे व राहुल शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, सीसीटीव्हीसाठी नागरिकांकडून अनधिकृत वर्गणी वसूल करणे तसेच खंडणी म्हणून एक लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी नीरा दुरक्षेत्रातील पोलिसांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तशी नोटीस पोलिसांना बजावण्यात आली आहे. 


   भरत निगडे व राहुल शिंदे हे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांच्या विरोधात वार्तांकन केले होते. याचा राग मनात धरून पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची धमकी दिली. त्यांना एक लक्ष रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांनी अर्जदाराच्या तक्रारीनंतर दीड महिन्यांनी अट्रोसिटीची केस नोंद केली. सीसीटीव्ही बसविण्याचे गावातील लोकांना अमिश दाखवत लाखो रुपये अनधिकृतपणे गोळा केले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलिसांना पाठीशी घातल्याची तक्रार भरत निगडे यांनी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार संबंधित पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याबाबत अर्ज केला. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने खुद्द पत्रकारच सासवड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यानंतर हे प्रकरण बारामती अप्पर पोलीस अधिक्षक कर्यालय कडे पाठविण्यात आले. त्यानंतर आता नीरा पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी सहायक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस हवालदार संदिप मोकाशी, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, हरिश्चंद्र करे, निलेश जाधव यांना चौकशी साठी बोलाविण्यात आले आहे. 


   दरम्यान, तक्रारदार भरत निगडें यांना आज म्हणणे सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, निगडे यांना नोटीस देण्यात आली नाही तसेच त्यांना कल्पना देखील देण्यात आली नाही. तक्रारदार पुरावे सादर करण्यास अनुपस्थित राहिल्यास तक्रार निकाली काढली जाईल अशा आशयाची नोटीस खुद्द तक्रारदारांना बजावण्यात आली नाही. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरण बंद करण्याचे ठरविले. मात्र दुपारी तीन वाजता निगडे यांच्या एका हितचिंतक मित्राने त्यांना नोटीस पाठवली. तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते तर पुरावे सादर करण्याची वेळ सकाळी ११ ची होती. ही बनवाबनवी लक्षात आल्यावर निगडे यांनी थेट बारामती गाठली व आपले म्हणणे सादर केले. 


     "चोर कोण व पोलीस कोण हे लोकांना लवकरच कळेल. पैशासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा निंदनीय प्रकार पोलिसांनी केला आहे. वेळ पडल्यास उच्च न्यायालयाचे दार ठोठावू पण न्याय मिळवूच. आमची अशी अवस्था असेल तर सामान्य लोकांना हे पोलीस कसे वागवत असतील याची कल्पना न केलेली बरी!"-  भरत निगडे, नीरा.

Saturday, June 3, 2023

पांगारे येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

 पांगारे येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या



सासवड दि.३

पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात सासवड पोलीससात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील किरण सिताराम शेलार यांनी यासंदर्भातील फिर्याद सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत संतोष संपत शेलार वय ४८ वर्षे राहणार पांगारे शेलारवस्ती हे जून रोजी दुपारी १ वा. चे सुमारास बालदरा डोंगराकडे गेला असून ताे अजुन आला नाही. अशी माहिती त्यांना त्यांच्या भावकितील हरीष महादेव शेलार यांनी दिली होती.रात्रीही ते घरी आले नाहीत.त्यामुळे दिनांक ३/६/२०२३ रोजी पहाटे त्याचा बासदरा डोंंंगराकडेे शोध घेतला आसता पांगारे गावचे हाद्दीत बालदरा डोंगरात जमीन गट नं. ९१८ मध्ये मयत स्थीतीत मिळुन आले आहे. त्याचे तोंडाचा वास येत होता. अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.पोलिसांनी मृत देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

            मयत संतोष शेलार हे कर्जबाजारी होते.त्यांनी सोयापनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता.मात्र त्यांना त्यात यश आले नाही.त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते.यातून च त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांकडून बोललं जात आहे. दरम्यान मयत संतोष शेलार हे माजी मंत्री व शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांचे भाचे म्हणजेच बहिणीचा मुलगा होता.त्यांच्या अशा प्रकारच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...