थोपटेवाडी येथील तीन तरुणाचा लोणंद येथे अपघातात मृत्यू
नीरा दि.६
थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील तीन तरुणांचा लोणंद येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे
थोपटेवाडी येथील तरुण एका मोटरसायकलवर लोणंद येथे गेले होते यावेळी बस आणि मोटरसायकल यांचा अपघात झाला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय
लोणंद -निरा रोडवर लोणंद पासून दोन किलोमीटर अंतरावरीलल रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच 20 बी एल
4158 व निरेकडून लोणंद निघालेली मोटरसायकल क्रमांक
एम एच 12 RV 3158 यांच्यात जोरदार धडक झाली
यामध्ये ओंकार संजय थोपटे ( वय २२) पोपट अर्जुन थोपटे ( वय २३)अनिल.नामदेव थोपटे (वय २५) अस या अपघातात मृत्यू झालेल्या तिघा तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे ही तीनही तरुण एकच घरातील असून ते त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुले होती.या घटने नंतर पिंपरे आणि थोपटेवाडी गावात शोककाळा पसरली आहे.थोपटे वाडी येथील ग्रामदैवत हनुमानाची आज यात्रा होती.गावात उत्सव साजरा होत असताना दुःखाची बातमी गावात गेली आहे. लोणंद पोलीस घटना स्थळी पोहचले असून त्यांनी मृत देह ताब्यात घेतले आहेत. व सेवाविच्छेदनासाठी लोणंद येथील सरकारी दवाखान्यात पाठवले आहेत