पुणे जिल्ह्यात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; १३ पैकी १० ठिकाणी सभापतीपदावर राष्ट्रवादीचा झेंडा : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर.

 पुणे जिल्ह्यात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; 


१३ पैकी १० ठिकाणी सभापतीपदावर  राष्ट्रवादीचा झेंडा : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर. 



पुणे : 

       जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी १० पंचायत समित्यांमध्ये सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून एक ठिकाणी शिवसेना, एक ठिकाणी शिवसेना (उबाठा) व भाजपलाही एक ठिकाणी संधी मिळाली आहे. मात्र एकूणच जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याचे या निवडणुकांतून स्पष्ट झाल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली आहे. 


      पुणे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत तब्बल ११ तालुक्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, मावळ, बारामती, पुरंदर, इंदापूर, भोर, मुळशी, वेल्हा (राजगड) आणि हवेली या पंचायत समित्यांमध्ये सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पटकावले. 


       जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे शैलेन्द्र कमल बाळू सभापती झाले आहे. खेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या विद्या सयाजी मोहिते यांची सभापतीपदी निवड झाली. तर, दौंड पंचायत समितीत मात्र भाजपचे सुखदेव सोनबा चोरमले सभापती झाले असून त्या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली आहे. 


      पुणे जिल्ह्यातील इतर १० तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने पक्षाचे वर्चस्व कायम राहिले. आंबेगाव येथे कैलास (बुका) भीमाजी काळे, शिरूरमध्ये घावटे स्वाती विठ्ठल, मावळमध्ये सुनिता मनोहर येवले, बारामतीमध्ये किरण रावसाहेब तावरे, पुरंदरमध्ये झेंडे अमित भाऊसाहेब, इंदापूरमध्ये हर्षवर्धन मधुकर लोंढे, भोरमध्ये मनीषा संतोष कंक, मुळशीमध्ये शेळके मंदा कृष्णात उर्फ बाबाजी, वेल्हा येथे राऊत सुवर्णा किरण तर हवेलीमध्ये काकडे युवराज हिरामण यांनी सभापतीपद मिळवले. 


      उपसभापती पदांवरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उमेदवार विजयी झाले असून काही ठिकाणी शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनाही संधी मिळाली आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांची आघाडी दिसून आली असून उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची निवड झाली आहे. 


          जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार, पंचायत राज संस्था आणि स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड कायम असल्याचे या निकालांतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही या निकालांचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे उपसभापती (पक्षनिहाय)

तालुका        उपसभापती                          पक्ष

जुन्नर.   अमित अनंता ढोले.       शिवसेना (उ.बा.ठा.)

आंबेगाव. ज्योती प्रवीण पारधी.       राष्ट्रवादी काँग्रेस

शिरूर. रामराव बबन सासवडे.         राष्ट्रवादी काँग्रेस

खेड. मंगेश गुलाब सावंत.           शिवसेना (उ.बा.ठा)

मावळ. साहेबराव नारायण कारके.    राष्ट्रवादी काँग्रेस

दौंड. अमृता अभिमन्यू गिरमकर.            भाजप

बारामती. शुभांगी सुनील आगवणे.    राष्ट्रवादी काँग्रेस

पुरंदर. प्रवीण बाळासाहेब जगताप.          शिवसेना

इंदापूर. जयकुमार गोपाळ कारंडे.    राष्ट्रवादी काँग्रेस

भोर. विशाल सुभाष कोंडे.               राष्ट्रवादी काँग्रेस

मुळशी. दगडू ना. करंजावणे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)

राजगड.  संदीप लहु खुटवड.          राष्ट्रवादी काँग्रेस

हवेली. विद्या दत्तात्रय गायकवाड.     राष्ट्रवादी काँग्रेस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई