Posts

Showing posts with the label राज्य सेवेतील तिसरा अतिरिक्त आयुक्त नको;:

राज्य सेवेतील तिसरा अतिरिक्त आयुक्त नको; कर्मचारी महासंघाचे राज्य शासनाला पत्र

Image
  राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदीही राज्य सेवेतीलच अधिकाऱ्याची नियुक्तीचा आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने जारी केल्याने स्थानिक अधिकारी नाराज झाले आहेत. महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांवर अन्याय होणार असल्याने पालिका कर्मचारी महासंघाने शासन सेवेतील अधिकाऱ्याला विरोध दर्शविला आहे. कर्मचारी महासंघाने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाला तिसरा अतिरिक्त आयुक्त पाठवू नका , या मागणीचे निवेदन पाठविले आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनाही पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राज्य सरकारचे प्रतिनियुक्तीने आलेले जितेंद्र वाघ आणि प्रदिप जांभळे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांची नियुक्ती केल्याने स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेल्या नगरसचिव उल्हास जगताप यांचे पद अडचणीत आले आहे. महापालिकेच्या नव्या आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्त...