Posts

Showing posts with the label सुलोचना चव्हाण अनंतात विलीन; .

लावणीचा अभिजात सूर हरपला, सुलोचना चव्हाण अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Image
  गे ल्या सहा दशकांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी ' पद्मश्री ' सुलोचना चव्हाण यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मरीन लाईन्स स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा विजय चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. चाहत्यांसह राजकीय आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे लावणीचा अभिजात सूर हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होत आहे. तमाशा फडातील लावणी घराघरात पोहोचवण्यात ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे मोलाचे योगदान होते. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनाबाईंची प्रकृती खालावली होती. शनिवारी सकाळी फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा , सुना , नातवंडे असा परिवार आहे. बहारदार लावण्यांची मैफल संपली , उद्धव ठाकरे यांची आदरांजली ' सुलोचना   चव्हाण यांच्या निधनाने लावणी गायकीतला...