ऊस उत्पादकांना खऱ्या अर्थाने न्याय
बा रामती-राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. राज्य शासनाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने विशेष अभिनंदन केल्याचे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले. बारामती येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जाचक म्हणाले , साखर उद्योगाच्या पाच मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , सहकारमंत्री अतुल सावे , कृषीमंत्री अब्दुल सत्तार , माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. महाविकास आघाडीने खासगी कारखान्यांना पोषक एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. त्यामुळे उत्पादकांवर अन्याय होत होता. यंदा रिकव्हरीवर एफआरपीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एफआरपीसाठी हंगाम संपण्याची वाट पहावी लागणार होती. मात्र , शासनाने मागील रिकव्हरीवर त्वरित एफआरपी एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. अनेक कारखान्यांवर उसाच्या वजन काट्याबाबत तफावत होती. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र , आता...