Posts

Showing posts with the label मृत्यू

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,

Image
-मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू, भोर दि. 10  मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं ह्या तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नावय.14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय. वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली  येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे.  मोहीत हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली...

भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू

Image
  भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू नदीत मोटार सोडत असताना झाला अपघात पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने घडली दुर्घटना      भोर दि.१५            पुण्यातील भोर तालुक्यातील निगडे गावात विजेचा शॉक लागून चारजण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडलीय आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये बापलेकांचा ही समावेश आहे.   यामध्ये विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव यांचा मृत्यू झालाय.. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलीस, आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.....