Thursday, December 15, 2022

भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू

 भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू




नदीत मोटार सोडत असताना झाला अपघात

पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने घडली दुर्घटना



     भोर दि.१५

           पुण्यातील भोर तालुक्यातील निगडे गावात विजेचा शॉक लागून चारजण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडलीय आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये बापलेकांचा ही समावेश आहे.

  यामध्ये विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव यांचा मृत्यू झालाय.. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलीस, आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.....


No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...