"राजीव, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काय केलं ते वारंवार सांगत बसू नका, तर 'या' मुद्द्यावर बोला"


 मुंबई : 'देशाच्या दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी महान काम केलं. त्यांनी जे काम केलं ते चांगलं होतं. आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.

पण प्रत्येक सभेत त्यांनी काय-काय केलं ते लोकांना वारंवार सांगत बसू नका. तर आता आपण लोकांसाठी काय करू शकतो. आपल्या योजना काय आहेत.याविषयी लोकांशी बोला त्यांच्या मनात विश्वास निर्माण करा', असं यांनी म्हटलंय. काँग्रेसची भारत जोडो सध्या राजस्थानमध्ये आहे. यात बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

महात्मा गांधी यांचं देशाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. त्या जागी मी कधीही जाऊ शकत नाही. गांधीजी आणि माझी तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी आयुष्य वाहिलं. अनेक वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी जे देशासाठी केलं त्याची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हा दोघांची तुलना कुणीही करता कामा नये, असं राहुल गांधी म्हणालेत.

काँग्रेसच्या एका नेत्याने भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या सभेत बोलताना गांधीजींची तुलना राहुल गांधीशी केली. त्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांनी अशी तुलना केली जाऊ नये, असं आवाहन केलं.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..