राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
काय झालं रात्री वाचा..
पुरंदर :
राख, कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. शनिवारी रात्री १२ ते ३ च्या सुमारास पुरंदर तालुक्यातील राख, महादेव गोठा, मानेवस्ती, कर्नलवाडी हद्दीतील बोरजाई मळा अशा वस्त्यावरील घरांचे कडिकोयंडे तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे.
शुक्रवारी रात्री झोपल्यानंतर रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास राख गावठाणात तीन चोरटे आल्याचे निदर्शनास आले. एका घारात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. या चोरट्यांनी गावच्या बाहेरील महादेव टेकडी शेजारील एक घरात प्रवेश मिळवला. या घरातील काही किरकोळ वस्तू चोरीला गेल्याचे घरातील लोकांनी सांगितले. याच घरात टेबलवर ठेवलेला लॅपटॉप बाजूला ठेवून लॅपटॉपची बॅग चोरटे घेउन गेल्याचे सांगण्यात आले आहे. चोरट्यांनी निरा बाजुकडे जात सुर्यवस्ती (माने वस्ती) याठिकाणी एका घराचे दार उघडून काही सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे सांगितले आहे. यानंतर साडेतीनच्या सुमारास कर्नलवाडी गावाच्या हद्दीतील बोरजाईमळा येथील एक उंचावरील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील इतर सदस्य बंगल्याच्या स्लॅबवर झोपले होते. एक जेष्ठ महिला बंगल्यात होत्या. त्यांच्या अंगावरील एकी सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिस्काऊन नेल्याचे सांगण्यात येत आहे. इतरही काही ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. पण लोक पोलिसांची कटकट नको म्हणून अधिकृतपणे काही संगत नाहीत.