२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर 



मुंबई :

        ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा झेंडा उंचावणाऱ्या पत्रकार संघांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण होणार असून, यानिमित्ताने राज्यातील तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावाही संपन्न होणार आहे.

      कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सकाळी ११ वाजता हा सन्मानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली. 


       ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरावर गौरव मिळावा, या उद्देशाने परिषदेच्या वतीने दरवर्षी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक महसूल विभागातून एका उत्कृष्ट तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात येते. यंदा विशेष बाब म्हणून विदर्भ विभागातून दोन तालुका पत्रकार संघांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच मुंबई विभागातूनही एका पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे. 


       यापूर्वी हे पुरस्कार वितरण सोहळे नागपूर, पाटण, अक्कलकोट, गंगाखेड, नगर जिल्ह्यातील कर्जत, माहूर, सेलू, वडवणी, पालघर आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले आहेत. यंदा हा बहुमानाचा सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप असून, हे पुरस्कार राज्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. 


२०२५ सालचा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार.

परभणी जिल्हा पत्रकार संघ यांना जाहीर झाला आहे. 


वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे :

नागपूर विभाग : बेला तालुका पत्रकार संघ, जि. नागपूर

नागपूर विभाग : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि. गडचिरोली

नाशिक विभाग : नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ, जि. नाशिक

कोकण विभाग : पनवेल महानगर प्रेस क्लब, जि. रायगड

पुणे विभाग : आंबेगाव तालुका पत्रकार संघ, जि. पुणे

लातूर विभाग : किनवट तालुका पत्रकार संघ, जि. नांदेड

संभाजीनगर विभाग : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, जि. बीड

अमरावती विभाग : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ, जि. बुलढाणा

कोल्हापूर विभाग : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ, जि. सांगली

मुंबई विभाग : उपनगर पत्रकार असोसिएशन 


     या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते, दर्वेश पालकर आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.