Type Here to Get Search Results !

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. 


घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद. 




पुरंदर : 

       नीरा येथील बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सौ. पंकजा अभिजीत नाकील (वय ३१) रा.नीरा प्रभाग ३ यांनी घरात चोरीची तक्रार दाखल केली आहे. 


    नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. १० मार्च सकाळी ११ ते मंगळवार दि. ११ मार्च सायंकाळी ५.३० च्या दरम्यान नीरा वार्ड नं ३ मधिल प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील सौ. पंकजा अभिजीत नाकील यांच्या बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. 


   फिर्यादी सौ. नाकील पुणे येथील घरी असताना नीरा येथील त्यांचे शेजारी राहणारे शबाना मुनीर शेख यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर फोनकरून सांगीतले की, तुमच्या बंगल्याचे कडी कोयंडा तोडुन त्यावर असलेले कुलुप तुटलेले दिसत आहे. घराचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही लवकर या असे सांगीतल्याने सौ. नाकील लागलीच नीरा येथे घरी आले. तेंव्हा त्यांच्या बंगल्याचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला व घरातील कपाटामधील साहीत्य आस्थाव्यस्थ पडलेले दिसले. त्यावेळी सौ. नाकील यांनी घरातील साहीत्य चेक केले असता, त्यातील साहित्य चोरीस गेले असल्याचे त्यांची खात्री झाली. त्यावेळी सौ. नाकील यांच्या घरात व आजुबाजुला शोध घेतला असता खालील साहीत्य मिळुन आले नाही. सर्वत्र शोध घेवुन बुधवार (दि.१२ रोजी) रात्री ०७ च्या सुमारास चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


     सौ. नाकील यांच्या घरातील चोरीस गेल्याचे मालाचे वर्णन खालील प्रमाणे. १) ४० हजार रु. कि. एक सोन्याचे लहान गंठण १५ ग्रॅम वजनाचे, २) ६० हजार रु.कि.सोन्याची साखळी ७ ग्रॅम वजनाची. ३) १२ हजार रु.कि. कानातील सोन्याचे एयरींग ०४ ग्रॅम वजनाची. ४) २५ हजार रु. कि. चांदीचे पैजन २० भाराचे, चांदीचे निरंजनी २ नग व चांदीचा कुंकवाचा करंडा १ नग असे दोन्ही २० भाराचे वजनाचे, ५) ३ हजर रु.कि. २० रूपये दराच्या १०० नोटा व ५०० रू दराच्या २ नोटा असा एकूण १ लाख ४० रुपये किंमतीचे प्रमाणेवरील वर्णनाचे सोने, चांदी व पैसे चोरीस गेले चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



       मंगळवारी पहाटे १.५० च्या सुमारास नीरेच्या वार्ड नं तीन मधिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात चोरटे आल्याची चाहुल युवकांना लागली होती. रात्री काही काळ युवकांनी चोरट्यांच्या आवाजाच्या दिशेनं पळापळ केली. पण अंधाराचा व झाडाझुडुपांमधून चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. नीरा पोलीसांना युवकांनी चोरटे आल्याचे सांगितल्या बरोबर रात्र गस्तीस असलेल्या पोलीसांनी पोलीस गाडी फिरवत चोरट्यांचा शोध परिसरात घेतला. पण चोरी कोणाची झाली हे मंगळवारी दुपारपर्यंत कळालेच नाही. दुपारी सौ. नाकील यांचे दार उघडे दिसल्यावर शेजारच्यांना शंका आली. या चोरीची घटना ससी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्या आधारे नीरा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies