Posts

Showing posts with the label "तुमचं नाव बदलून आगलावे करा"

सुषमा अंधारेंना आशिष शेलार म्हणाले,"तुमचं नाव बदलून आगलावे करा" ; तर प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या,"या सर्वांना काय.."

Image
  मुं बई :   ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मागील काही दिवसांपासून भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या याच टीकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी "तुम्ही तुमचं नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा" असा खोचक सल्ला अंधारेंना दिला आहे. तर दुसरीकडे अंधारेंनी देखील त्यांच्या खोचक टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी "स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही" , असे म्हटले. तर आता त्यांचा टीकेला उत्तर देताना "राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य तुम्हाला करावी लागत आहेत. मात्र , अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांचे हाल काही काळानंतर काय होतात , हे मनिषा कायंदेंना विचारा" , असंही शेलार अंधारेंना उद्देशून म्हणाले आहेत. "आम्ही आगलावे असू तर हवेत गोळीबार करणारे सदा सरवणकर कोण आहेत ? जे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात , जे संजय गायकवाड ' चून चून के मारेंगे ' म्हणतात , आम्ही हिशोब चुकता करू , अशी जाहीर गुंडांची भाषा तानाज...