पोस्ट्स

पेट्राेल आणि डिझेललाजीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेट्राेल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

इमेज
  न वी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेललाजीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. मात्र , त्यासाठी राज्य सरकारांचीही सहमत आवश्यक असल्याची पुस्तीही त्यांनी जाेडली. पेट्राेल आणि डिझेललाजीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याबाबत पुरी यांनी सांगितले , की त्यासाठी राज्यांची सहमती आवश्यक आहे. राज्यांनी पुढाकार घेतल्यास केंद्राची तयारी आहे. मात्र , तशी शक्यता कमीच असल्याचेही पुरी म्हणाले. मद्य आणि पेट्राेलयम उत्पादनांच्या विक्रीतून राज्यांना माेठा महसूल मिळताे. त्यामुळे सर्वच राज्यांनी यापूर्वी प्रस्ताव फेटाळला हाेता. गेल्या आर्थिक वर्षात केंद्राने सुमारे ५ लाख काेटी रुपयांचा महसूल पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रीतून गाेळा केला. तर राज्यांनी सुमारे ३ लाख कोटी कमावल्याची माहिती संसदेत देण्यात आली हाेती.