अमळनेर हादरले ! दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलीने दिला बाळाला जन्म
२० नोव्हेंबर २०२२ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाचे दिसून येतेय. अशातच अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आणि या प्रकारातून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने स्वतः फिर्याद दिली आहे. निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी ९ वी ला असतांना तू मला आवडते. आपण लग्न करू दोघे पळून जाऊन असे सांगत होता. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने तू माझ्याशी प्रेमसंबंध कर अन्यथा तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल , अशी धमकी देत होता. घाबरून मुलीने हो म्हटल्यावर समाधान याने पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. हे प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्...