Posts

Showing posts with the label मंचरकरांनी स्वतःहून काढली महामार्गालगतची अतिक्रमणे

मंचरकरांनी स्वतःहून काढली महामार्गालगतची अतिक्रमणे

Image
  मं चर:   राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी अतिक्रमणे काढण्याबत व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांना प्रतिसाद देत मंचर शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. मंचर शहरातून जात असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर लगतच्या व्यवसायिकांकडून दुकानांच्या नावांचे बोर्ड लावणे , टपऱ्या उभारणे , छोटे-छोटे पत्रा शेड उभारणे आदी प्रकारची अतिक्रमणे करण्यात आली होती. या बाबींमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये या उद्देशाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना सदर अतिक्रमणे काढण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे काढली नाही तर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचा इशाराही संबंधित व्यावसायिकांना दिला होता. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या आतिक्रमन विरोधी कारवाईच्या नोटीसा मिळताच मंचर परिसरातील पुणे-नाशिक महामार्गालागत व्यवसाय करणारे काही व्यापारी व व्यवसायिक एकत्र आले व त्यांनी स्वतःहून ही अतिक्रमणे काढण्याबाबत भूमिका घेत इतरांनाही अतिक्रमणे काढण्याची विनंती केल...