पंतप्रधानांच्या मान्यतेनंतर स्क्रॅपिंग पॉलिसी लागू करणार, 15 वर्षे जुनी वाहनं भंगारात काढली जाणार: नितीन गडकरी
ना गपूर: सर्व सरकारी वाहनं 15 वर्षानंतर स्कॅप करणार असून , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 15 वर्षानंतर वाहनं ही जुनी होतात , त्यातून प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हा निर्णय फक्त केंद्रापुरताच असेल की राज्यांनाही लागू होईल यावर अद्याप स्पष्टता नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 जुलै 2019 रोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या 15 वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अंमलात येणार आहे. सरकारी विभागाच्या 15 वर्षापेक्षा जुन्या गाड्यांचे 1 एप्रिल 2022 पासून रजिस्ट्रेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात येणार असल...