ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १ सप्टेंबरला पुण्यात भव्य मूक मोर्चा
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १ सप्टेंबरला पुण्यात भव्य मूक मोर्चा हल्ल्यांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत अधिकारी आक्रमक; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा पुणे, दि. ३१ : कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, धमक्या, दबाव आणि मानसिक त्रासाच्या घटनांना आळा घालून त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारीही या आंदोलनात सहभागी होणार असून जिल्हा परिषद पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा शांततामय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष अमोल घोळवे आणि सरचिटणीस संदीप ठवाळ यांनी केले आहे. जळगावच्या घटनेनंतर संतापाची लाट जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये १७ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित ग्र...