सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही मिळणार रोजगार; या योजनांचा घेता येईल फायदा
मुंबई , 06 डिसेंबर: भारतात फेरीवाले , टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या खूप आहे. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या समाजातील या घटकांचे प्रचंड हाल झाले. रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली होती. केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी आता फेरीवाले , टपरीधारक अन् हातगाडीवाल्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. या माध्यमातून त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध होईल , अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ' आज तक हिंदी ' नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यात फेरीवाले , टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या अधिक आहे. या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. या साठी केंद्राने स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे. 14,000 फेरीवाले , टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांना लाभ देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना बनवली गेली आहे. या सर्वांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन दिवसाचं प्रशिक्षण शिबिर या योजनेअंतर्गत फेर...