पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी. निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित.

इमेज
कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी.  निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित.  पुरंदर :         पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकित बिलामुळे खंडित झाल्यानंतर गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र उपसरपंच राजेश काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांच्या तत्परतेमुळे अवघ्या २४ तासांतच वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.         निरा शिवतक्रार गावात शुक्रवारी अचानक पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे वीजबिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला होता. परिणामी गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.      मात्र, अशा संकटाच्या वेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीने पुढाकार घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित...

“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी

इमेज
“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख  राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी  मुंबई :        महाराष्ट्रात पत्रकारांवर वाढत्या दबावाच्या आणि दडपशाहीच्या घटना चिंताजनक स्वरूप धारण करत असून, हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच बाधा आणणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सत्य व निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.        अकोला येथे टीव्ही 9 चे बातमीदार गणेश सोनोने, सामच्या बातमीदार हर्षदा सोनोने यांच्यासह पाच पत्रकारांना हक्कभंग समितीकडून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका आमदारासंदर्भात वस्तुनिष्ठ बातमी दिल्यामुळे अशी कारवाई करण्यात येणे अत्यंत धक्कादायक असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात सत्य मांडू नये, असा अप्रत...

पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने.

इमेज
पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा  तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने. पुरंदर :        गॅसच्या किमतीत झालेली भरमसाठ दरवाढ, गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी दिली आहे.          पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने युवा नेते दत्ता झुरुंगे, सुनील असवलीकर व प्रा. सचिन दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गॅस व शेती खतांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याविरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून नागरिक, महिला, युवक तसेच ...

सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनकडून सभासदांची दिशाभूल ? : सतीश काकडे यांचा आरोप अनुदाना बाबत ही प्रश्नचिन्ह

इमेज
  सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनकडून सभासदांची दिशाभूल ? : सतीश काकडे यांचा आरोप  अनुदाना बाबत ही प्रश्नचिन्ह   ऊस  तोडणी साठी जादा खर्चामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या उस अनुदानाबाबत सभासदांची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कृती समितीचे श्री सतीशराव काकडे यांनी केला आहे. कारखान्याने उस गाळपासाठी दिलेले अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून उलट त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, कारखान्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसाला १०० रुपये प्रतिमेट्रिक टन, मार्च महिन्यात २०० रुपये आणि एप्रिल महिन्यात ३०० रुपये प्रतिमेट्रिक टन अनुदान जाहीर केले होते. मात्र, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच कारखाना बंद होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील अनुदान कोणाला मिळणार, असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी महिन्यात सोमेश...

उदगीरमध्ये १८-१९ एप्रिलला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष

इमेज
उदगीरमध्ये १८-१९ एप्रिलला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष  मुंबई :        अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.  ८७ वर्षांची परंपरा जपणारी मातृसंस्था           मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची तब्बल ८७ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. राज्यातील विविध भागांमध्ये दर दोन वर्षांनी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जाते. यापूर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथे अधिवेशने झाली होती. यंदा उदगीर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी ज...

पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल आदित्य संतोष सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

इमेज
 पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल आदित्य संतोष सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार    निरा परिसरातील तरुण आदित्य स्वाती संतोष सूर्यवंशी यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आदित्य यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सर्जेराव पुजारी साहेब यांच्या शुभहस्ते आदित्य सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. दत्ताजीराव रामराव चव्हाण (आबा) यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने प्रसिद्ध फेटेवाले माऊली गायकवाड यांच्या हस्ते आदित्य यांना फेटा बांधून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, दत्ताजीराव चव्हाण आबा तसेच ग्रामस्थांच्या वतीने आदित्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य यांच्या आईचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश घुले सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचा संघर्षमय प्रवास मा...

पुणे जिल्ह्यात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; १३ पैकी १० ठिकाणी सभापतीपदावर राष्ट्रवादीचा झेंडा : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर.

इमेज
 पुणे जिल्ह्यात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व;  १३ पैकी १० ठिकाणी सभापतीपदावर  राष्ट्रवादीचा झेंडा : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर.  पुणे :         जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी १० पंचायत समित्यांमध्ये सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून एक ठिकाणी शिवसेना, एक ठिकाणी शिवसेना (उबाठा) व भाजपलाही एक ठिकाणी संधी मिळाली आहे. मात्र एकूणच जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याचे या निवडणुकांतून स्पष्ट झाल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली आहे.        पुणे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत तब्बल ११ तालुक्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, मावळ, बाराम...

पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी-शिवसेना (शिंदे गट)ची अनपेक्षित युती; अमित झेंडे सभापती, प्रवीण जगताप उपसभापती

इमेज
पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी-शिवसेना (शिंदे गट)ची अनपेक्षित युती; अमित झेंडे सभापती, प्रवीण जगताप उपसभापती  पुरंदर :         पुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सोमवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनपेक्षित युती झाली. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे प्रवीण जगताप यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. या मनोमिलनामुळे पुरंदर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.              पुरंदर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन सदस्य निवडून आले होते. सभापती निवडीसाठी आवश्यक असलेले पाच सदस्य कोणत्याही पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंगमेकरची भूमिका होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत की शिवसेनेसोबत युती करणार याबाबत रविवारी सायंकाळपर्यंत अनिश्चितता होती.         मात्र सोमवारी...

पुरंदर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष; कोण होणार सभापती - उपसभापती? राजकीय घडामोडींना वेग

इमेज
पुरंदर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष; कोण होणार सभापती - उपसभापती? राजकीय घडामोडींना वेग  पुरंदर :         पुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी (दि.९) निवडणूक होत असून महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. आठ सदस्यांच्या पंचायत समितीत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी कोण कोणासोबत हातमिळवणी करणार याकडे संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.       पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना महिना उलटल्यानंतर आता पुरंदर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक पार पडणार आहे. पंचायत समितीत एकूण आठ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत.          संख्याबळाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ‘पाच’ हा आकडा कोणाकडेही नसल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गर...

महिला दिनानिमित्त निरा शहरातील महिला बचत गटांची ‘शिवथरघळ’कडे भक्तीमय सहल दासबोध वाचनाने रंगला आध्यात्मिक सोहळा; माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा उपक्रम.

इमेज
महिला दिनानिमित्त निरा शहरातील महिला बचत गटांची ‘शिवथरघळ’कडे भक्तीमय सहल  दासबोध वाचनाने रंगला आध्यात्मिक सोहळा; माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा उपक्रम.  पुरंदर  :         महिला दिनानिमित्त महिलांच्या कष्टमय आयुष्यात आनंदाचे आणि अध्यात्मिक समाधानाचे क्षण यावेत या उद्देशाने निरा शहरातील महिला बचत गटांच्या महिलांसाठी शिवथरघळ येथे मोफत धार्मिक सहलीचे आयोजन माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण यांच्याकडून करण्यात आले. सुमारे ४० महिलांनी या सहलीत सहभागी होत समर्थांच्या पवित्र स्थळी दर्शन घेत भक्तीभावाने दासबोधाचे वाचन केले.             ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने निरा शहरातील महिला बचत गटातील महिलांसाठी शिवथरघळ येथे नुकतेच मोफत धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आयुष्यातील दैनंदिन जबाबदाऱ्या आणि कष्टांमधून थोडा विरंगुळा मिळावा तसेच अध्यात्मिक समाधान लाभावे या हेतूने ही सहल आयोजित करण्यात आली होती.         या सहलीमध्ये निरा शहरातील सुमारे ४० महिला सहभागी झाल्या. सहलीसाठी निघ...

डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार; बारामतीत 74 वर्षीय महिलेला 45.60 लाखांचा गंडा

इमेज
 डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार; बारामतीत 74 वर्षीय महिलेला 45.60 लाखांचा गंडा पोलीस असल्याचे सांगत व्हिडिओ कॉल; अटक वॉरंटची भीती दाखवून एफडी तोडायला लावली बारामती :  बारामती शहरात सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत एका भामट्याने 74 वर्षीय महिलेकडून तब्बल 45 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे (वय 74, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीकडून मोबाईलवर WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव “संदीप पाटील” असे सांगत तो पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला आणि पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने महिलेला त्यांच्या विरोधात अटक वॉरंट असल्याचे सांगून “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवली. या भीतीमुळे महिला मानसिक दबावाखाली आल्याने आरोपीने त्यांना बँकेतील ...

नीरेतील धाडसी पोलिसांचा पत्रकार संघाकडून सत्कार

इमेज
 नीरेतील धाडसी पोलिसांचा पत्रकार संघाकडून सत्कार सिनेस्टाईल कारवाईत अपहरणग्रस्त तरुणाची सुखरूप सुटका नीरा | प्रतिनिधी भोर तालुक्यातील कापूरहोळ येथून अपहरण झालेल्या तरुणाची सिनेस्टाईल पाठलाग करून सुखरूप सुटका करणाऱ्या नीरा पोलिसांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि नीरा प्रेस क्लब यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या धाडसी कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास कापूरहोळ येथील व्यावसायिक लखन दळवी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ते नीरा दिशेने निघाल्याची माहिती मिळताच नीरा दूरक्षेत्रातील पोलिसांनी तात्काळ शहरात नाकाबंदी केली. तसेच अपहरणकर्ते ज्या मार्गाने येण्याची शक्यता होती त्या दिशेने पोलीस वाहनासह धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी मुख्य रस्ता सोडून कच्च्या मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग कायम ठेवला. घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी तरुणाला चालत्या गाडीतून रस्त्यावर ढकलून दिले. पोलिसांनी तत्काळ त्या मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील पाठलाग सुरू...

भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका

इमेज
 कापूरहोळ थरारलं! भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका नीरा | ता. पुरंदर | पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः हादरला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या अवघ्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि काही क्षणांतच भीतीचं सावट संपूर्ण परिसरावर पसरलं. मात्र, नीरा दूरक्षेत्र आणि जेजुरी पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे काही तासांतच या थरारक प्रकरणाचा सुखद शेवट झाला. पांढऱ्या XUV700 मधून अपहरण; गावात खळबळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची (XUV700) MH 12 XE 5353 क्रमांकाची कार कापूरहोळमध्ये आली आणि क्षणात युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पसार झाली. हा प्रकार इतक्या वेगात घडला की साक्षीदारही थक्क झाले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले,  संबंधित मुलाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल करून लोकांकडे मदत मागितली होती. जेऊर मांडकी आणि निरा परिसरामध्ये हा कॉल केला गेला होता. त्यामुळे या भागातील स्थानिक लोक देखील सतर्क झाले होते. त्यांनी देखील पोलिसांना तातडीन...

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

इमेज
कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई पुरंदर :      पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ (ता.भोर) मध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या एका थरारक अपहरणप्रकरणाने संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडलं. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाला भरदिवसा काळ्या XUVमधून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि काही क्षणांत गावात भीतीचं सावट दाटून आलं. पण काही तासांतच पोलिसांनी उभारलेल्या ‘सर्जिकल नाकाबंदी’मुळे चित्र पालटलं—आणि युवकाची सुखरूप सुटका झाली.  क्षणात घडलेलं अपहरण, गावात खळबळ       दुपारचा नेहमीसारखा गजबजलेला वेळ. कापूरहोळच्या मुख्य रस्त्यावर अचानक एक काळी XUV थांबते… काही क्षणांची झटापट… आणि युवकाला जबरदस्तीने गाडीत बसवून वाहन भरधाव वेगाने निघून जातं. हा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की परिसरातील लोक स्तब्ध झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश पसरवण्यात आला आणि गावागावातून सतर्कतेचे सायरन वाजू लागले.  ‘ऑपरेशन नाकाबंदी’ — रस्ते सीलबंद  म...

सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर? गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.

इमेज
सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर?   गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.  सोमेश्वरनगर :          “सोमेश्वर कारखाना यंदाही सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम ठेवणार असून सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि अधिक दर देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे चालू गाळप हंगाम यशस्वीरित्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.          कारखान्याने आजअखेर एकूण ११,४४,५१२ मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. बी-हेवी वगळता सरासरी ११.८७ टक्के साखर उतारा राखत १३,४३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. तसेच डिस्टिलरी प्रकल्पामधून ४८,६०,५३३ लिटर्स अल्कोहोल निर्मिती झाली असून सहविज निर्मिती प्रकल्पातून ६,४९,६०,४८० युनिट्स वीज महावितरण कंपनीस विक्री करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.  ऊसदर व अनुदानाची सविस्...