कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना

कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना कर्जदारांना आरबीआयकडे करता येणार तक्रार नवी दिल्ली दि.२५ कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अशा स्पष्ट सूचना अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिल्या आहेत कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावल जात किंवा इतर मार्गाने त्रास दिला जातो. कर्जदारांना हा त्रास जास्त अनेक वेळा सहन करावा लागताे. मात्र, आता बँकांना असं करता येणार नाही. लहान कर्जदारांना परतफेडीसाठी छळू नका, अशा सूचना सर्व सरकारी व खासगी बँकांना दिल्या माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभेत दिली आहे या समस्येबाबत हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, सर्वच बँकांनी अशी प्रकरणे संवेदनशीलता राखून माणुसकीच्या भावनेतून साेडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कठाेर मार्गांचा अवलंब करू नये. कर्जवसुलीबाबत काही नियमही करण्यात आले आहेत.त्यानुसार वसुली एजंटने ग्राहकाला सकाळी ८ ते सायं ७ या वेळेतच कॉल करावा. ग्राहक...