डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार : एस.एम.देशमुख
डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार : एस.एम.देशमुख पुणे दि.२२ महाराष्ट्रात सहा हजारांच्या आसपास यु ट्यूब चॅनल्स आणि न्यूज पोर्टल्स कार्यरत आहेत..अगदी तालुक्यात आणि गाव पातळीवर देखील युट्यूब चॅनल्स जाळे विणले गेले आहे.. उद्याची गरज लक्षात घेऊन सरकार देखील युट्यूब चॅनल्स नोंदणीसाठी नवी व्यवस्था सुरू करीत आहे.. महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांसाठी पुरस्कार योजना यापुर्वीच सुरू केलेली आहे.. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषद नव्या बदलापासून दूर राहू शकत नाही.. काळाची गरज लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने देखील डिजिटल मिडिया परिषद नावाची स्वतंत्र विंग सुरू केलेली आहे.. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.. राज्यातील पुणे, सातारा, बीड, भंडारा आणि अन्य जिल्ह्यात हे काम वेगात सुरू आहे..सर्व जिल्ह्यात सदस्य नोंदणी आणि अस्थाई शाखा सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये डिजिटल मिडिया परिषदेचा एक मेळावा पुण्यात घेण्यात येईल.. तेथेच राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडली जाईल.. डिजिटल मिडिया परिषद हा मराठी पत्रकार परिष...